मंदिरे उघडण्यासाठी भाजप पाठोपाठ मनसे आक्रमक

पुणे:मंदिरे राज्य सरकारने अजूनहि उघडली  नाहीत म्हणून विरोधी पक्ष मंदिर उघण्यासाठी राज्य सरकार विरुद्ध    आंदोलन करताना दिसून येत आहेत. भाजप ने 2 दिवसांपूर्वी मंदिरे उघडण्यासाठी आंदोलन केले होते.पण आज मनसे ने पण मंदिरे उघडण्यासाठी घंटानाद आंदोलन केले.मनसे चे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तसे पत्रकार परिषद घेवून कार्यक्रत्याना व पदाधिकाऱ्याना आदेश दिले होते.त्याच आदेशाचे पालन करून आज कार्यकत्यांनी आख्या  राज्यभर मनसे कार्यकर्त्यांनी मंदिराच्या बाहेर आंदोलन केले.


मनसे कार्यकर्त्यांनी पुण्यातिल तांबडी जोगेश्वरी मंदिराच्या बाहेर मंदिरे उघड करावी म्हणून आंदोलन केले . या आंदोलनाचे नेतृत्व मनसे  शहर अध्यक्ष वंसंत मोरे यांनी केले. या आंदोलनाला मनसेचे उपविभाग प्रमुख मयूर सुतार, सारंग सराफ, रूपाली पाटील ठोबरे, राजेंद्र सुयंवशी, अशोक दळवी कोथरूड मतदारसंघ उपाध्यक्ष, नगसेवक साईनाथ बाबर, अभिजित ठेबे कर, गणेश भोकरे,विक्रम आमराळे,कसबा मतदार संघातिल पदाधिकारी व कार्यकर्ते व मनसेचे शहरातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या आंदोलनाच्या वेळी राज्य सरकारचा मनसे कडून निषेध करण्यात आला.

आंदोलनाच्या वेळी मनसे कडून तांबडी जोगेश्वरी देवीच्या मंदिराची आरती करण्यात आली.
वसंत मोरे म्हणाले,संपूण महाराष्ट्रमध्ये आघाडी सरकार लॉक डा ऊन  करत आहे.राज्य सरकार ने मंदीरे सोडून सगळे उघडले आहे.राज साहेब यांच्या आदेशानू सार मंदिरे उघडली पाहिजेत म्हणून आज आम्ही आंदोलन करत आहोत आम्ही आजतांबडी जोगेश्वरी देवीच्या मंदिराची आरती करणार आहोत.या सरकारला लवकरात लवकर जाग मंदीरे उघडण्याची जाग यावी म्हणून आज आम्ही आंदोलन करत आहोत.

Leave a Reply

%d bloggers like this: