अबब… क्रुरकर्मा सावकार नानासाहेब गायकवाड आणि त्याच्या टोळीतील सदस्यांची मासिक उलाढाल १०० कोटी रुपयांची..

गायकवाड टोळीतील अजून एक सदस्य दिपा पवारला अटक..

पुणे : सावकार नानासाहेब गायकवाड व त्याचा मुलगा केदार उर्फ गणेश गायकवाड याच्यावर पुणे व पिंपरी पोलिसांनी मकोका कायद्यानुसार कारवाई करुन त्यांना अटक केली आहे. दिपा पवार उर्फ गायकवाड हिला अटक केल्यामुळे गायकवाड टोळीतील सदस्यांची संख्या आठवरून नऊ अशी झाली आहे. तिच्या अटकेबरोबर आणखीण धक्कादायक खुलासे समोर येउ लागले आहेत. गायकवाडसह त्याच्या टोळीतील सदस्यांची सर्व वैध अवैध पद्धतीने मासिक उलढाल ही 100 कोटींच्या घरात असल्याचे धक्कादायक सत्य उजेडात येत आहे. त्याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत.

खासगी सावकारीसह विविध प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या औंध येथील गायकवाड कुटुंबीयांच्या घराची पोलिसांनी नुकतीच घरझडती घेतली. त्यात पोलिसांना काही मुद्देमाल सापडला आहे. मात्र अद्याप काही कागदपत्रे, लोकांकडून जबरदस्तीने लिहून घेतलेले दस्तावेज, बेहिशोबी मालमत्ता, रोख रकमा या आरोपींनी नियोजनबद्धरित्या कट रचून अनोळखी ठिकाणी लपवून ठेवलेल्या आहेत. हे सर्व दस्ताऐवज लपवण्यामध्ये दिपा पवार हिचा मुख्य सहभाग असल्याचे दिसून आले आहे. याप्रकरणी तिला पोलीसांनी अटक केली असून तिला पोलीस कोठडी मिळाली आहे.

यापुर्वी अटकेत असलेल्या नानासाहेब ऊर्फ भाऊ शंकरराव गायकवाड (वय ७०), नंदा नानासाहेब गायकवाड (वय ६५) आणि गणेश ऊर्फ केदार नानासाहेब गायकवाड (सर्व रा.एनएसजी हाऊस, औंध) यांना पोलिस कोठडीत तीन सप्टेंबरपर्यंत वाढ करण्यात आली होती.

गायकवाड त्यांच्या घरातील सीसीटीव्हीचे संच बंद असून उपलब्ध असलेल्या डीव्हीआर तसेच तेथील इतर इलेक्ट्रानिक साधनांमध्ये छेडछाड केल्याचे दिसून आले आहे. तसेच अनेक कागदपत्रे फाइल्समधून काढून घेण्यात आले आहे. नानासाहेब गायकवाड यांच्या बेडरुमध्ये पैसे मोजण्याची एक मशिन मिळून आल्याचे सरकारी वकील विजय फरगडे यांनी न्यायालयाला निदर्शनास आणून दिलेले.

मूळ फिर्यादीतर्फे  पुष्कर दुर्गे, सचिन झालटे, ऋषिकेश धुमाळ कामकाज पाहत आहे. सहायक पोलिस आयुक्त बजरंग देसाई हे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.–

Leave a Reply

%d bloggers like this: