fbpx

किरकोळ घरगुती वादातून मुलाचे जन्मदात्या आईवर विळयाने वार, मुलाची आत्महत्या

बीड : किरकोळ घरगुती वादातून जन्मदात्या आईवरच विळयाने वार करून मुलाने स्वतः आत्महत्या केल्याची घटना बीडच्या माजलगाव तालुक्यातील मालीपारगाव येथे घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेत जखमी झालेल्या आईची तब्येत गंभीर असून त्यांच्यावर बीडच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,पारूबाई मच्छिंद्र कदम वय (50) असे जखमी झालेल्या महिलेचे नाव असून बापू मच्छिंद्र कदम वय (30) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. पारूबाई व बापू यांच्यात नेहमी घरगुती कारणावरून किरकोळ वाद होत असत. आज दुपारी पुन्हा या माय लेकांमध्ये वाद झाले. काही वेळातच वाद विकोपाला गेला. त्यावेळी राग अनावर न झालेल्या मुलाने विळयाने जन्मदात्या आईच्या मानेवर सपासप वार केले आणि त्यानंतर स्वतः आत्महत्या करत आपले जीवन संपवले. या वादात आई गंभीर जखमी झाली असून त्यांना माजलगावच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी त्यांना बीड येथील शासकीय रुग्णालयात अधिक उपचारासाठी हलवले आहे. दरम्यान, या घटनेने घाबरलेल्या मुलाने शेतात एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

Leave a Reply

%d bloggers like this: