Pune – गेल्या 24 तासात कोरोनाचे 292 नवीन रुग्ण तर 189 रुग्णांना डिस्चार्ज
पुणे: शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. आज पुणे शहरातील नवीन रुग्णांची संख्या दोनशेच्या पुढे आली आहे. तर अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या दोन हजाराच्या पुढे आली आहे . गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये 292नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 189रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 95हजार 878 इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 4 लाख 84हजार 584ईतके रुग्ण बरे झाले आहेत.
पुण्यात गेल्या 24 तासात 13रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील9तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील4रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 8931जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पुणे शहरामध्ये सध्या 2363अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 205रुग्ण गंभीर आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 10156 स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पुणेमहापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
