कायनेटिक इंजिनियरींग लिमिटेड चा ५० वा वर्धापनदिन साजरा, ऑटो सिस्टम व्यवसायात मिळवला नफा

पुणे : अनेक पिढ्यांपासून घराघरात पोहोचलेले नाव कायनेटिक तर्फे  आपला ५० वा वर्धापनदिन हा आनंदाच्या बातमीने साजरा करण्यातयेत असून ही बातमी कंपनी आणि शेअरधारक दोघांसाठी उत्साहवर्धक आहे. ती  म्हणजे कंपनी ने सलग दोन तिमाही मध्ये फायदा मिळवला आहे. कंपनी कडून सातत्याने सर्वोत्कृष्ट कामगिरी करण्यात येत असून खर्च कमी करत अधिक लाभ मिळवण्या बरोबरच आता कंपनीचे पुर्नगठन हे नवीन वचनबध्दतांसह पूर्ण करण्यात यश प्राप्त केले आहे.

वर्धापन दिना विषयी बोलतांना कायनेटिक  इंजिनियरींग लिमिटेड चे एमडी अजिंक्य फिरोदिया यांनी सांगितले “ मला ही घोषणा करतांना आनंद होत आहे की आमचे व्यवसायिक पुर्नगठन तसेच व्यावसायिक दृष्टिकोन बदलण्याचे  कार्य  पूर्ण झाले आहे.  आमच्या चमूकडून कर्जांची पुर्नबांधणी, लेआऊटमधील बदल,गुणवत्ता पध्दतींचे नुतनीकरण, नवीन ग्राहक जोडणे,बॅकवर्ड इंटिग्रेशन आणि अंतिमत: कठीण काळाचा सामना यासाठी एक दशकाचा कालावधी गेला.   आम्ही भाग्यशाली आहोत की या सर्व गोष्टींचा योग हा ५०व्या वर्धापन दिनाशी जोडल्या जात आहे, आणि आमच्यावर विश्वास दाखवणार्‍या शेअरधारकांसाठीही  ही सन्मानाची बाब आहे.  अनेक वर्षांपासून आमच्याशी एकनिष्ठ असलेल्या आणि यशात भागीदार असलेल्या आमच्या कर्मचार्‍यांसाठीही ही सन्मानाची गोष्ट असून आम्ही त्यांचा सन्मान करण्याची योजना आखली आहे.”

आजमितीस केईएल कडून कार्स, बसेस, ट्रक्स, ट्रॅक्टर्स साठी ट्रान्समिशन उत्पादने आणि अन्य जनरल  इंजिनियरींग ॲप्लिकेशन्स साठी उपयुक्त उत्पादनांची निर्मिती केली जाते. त्यांच्या कडून व्यावसायिक वाहनांसाठी गिअरबॉक्स चे ही उत्पादन केले जात असून त्यांनी स्वत: इलेक्ट्रिक ॲक्सेल ॲप्लिकेशन ही तयार केले आहे.  त्यांच्या ग्राहकांमध्ये बाजारपेठेतील प्रतिथयश अशा ग्राहकांचा समावेश आहे.  यामध्ये एमॲन्डएम, टाटा, अशोक लिलँड, कॅरेरो, रॅनॉ निस्सान, अमेरिकन ॲक्सेल आणि अन्य कंपन्यांचा समावेश आहे.  ऑटो बाजारपेठेतील सर्वोत्कृष्ट निकषांनुसार कंपनी कडून ग्राहकांना उच्च गुणवत्तेची उत्पादने आणि सूटे भाग हे अतिशय स्पर्धात्मक किंमतीत उपलब्ध करून दिले जातात. सातत्याने नाविन्यपूर्ण आणि अद्ययावत गोष्टींमध्ये गुंतवणूक केली असल्याने कंपनीला आता इंटरनॅशनल ट्रॅक्टर्स,सोनालिका कडून नवीन व्यवसाय प्राप्त झाला असून त्यांचा पुरवठा लवकरच सुरू करण्यात येणार आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: