पीएमपी -सेवानिवृत्त व उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कामगारांचा सत्कार

पुणे : पीएमपीएमएल च्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या १८ व उल्लेखनीय कामगिरी केलेल्या ४ अशा एकूण २२ अधिकारी/कर्मचारी यांचा सत्कार समारंभ स्वारगेट येथील मुख्यालयात पार पडला. या सर्व सत्कारमूर्तींचा सन्मानपत्र व गुलाबपुष्प देऊन पीएमपीएमएलचे पास विभाग प्रमुख श्री. विक्रम शितोळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कामगार व जनता संपर्क अधिकारी श्री. सतिश गाटे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.

 प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झालेले विविध पदांवरील  सेवक असे : वरिष्ठ लिपिक विजय दशरथ गुंजाळ, कंट्रोलर कम चेकर शांताराम धोंडिबा गरुड, श्री.शशिकांत ज्ञानदेव कांबळे, संजय मारुती हुलावळे, विक्रम हिरोजी जाधव, नाईक   विजय वसंतराव निकाळजे, हेल्पर ज्ञानेश्वर मोरू पाडळे, चंद्रकांत रघुनाथ ढोके,  ज्ञानेश्वर नथु फुगे,  क्लिनर  मधुकर रामचंद्र वाडेकर,  उत्तम राणोजी ढोरे, सिनिअर ड्रायव्हर  लक्ष्मण परसराम दिवेकर, ड्रायव्हर  इलियासखान नसरूल्लाखान, राजेंद्र हरी वाखारे, कंडक्टर : दत्तात्रय गणपत धुमाळ, किशोरकुमार मारुतराव जाधव, अंगद व्यंकटराव पवार, गजानन रामचंद्र सदानंद

उल्लेखनीय कामगिरी केलेले सेवक असे :  चंद्रशेखर कदम, कोथरूड डेपो मॅनेजर, राजेश बुनगे, लिपिक, स्वारगेट मुख्यालय

कामगिरी : परिवहन महामंडळास पेट्रोलियम संरक्षण अनुसंधान संघ (पीसीआरए) यांचेमार्फत इंधन बचतीचा राष्ट्रीय स्तरावरील प्रथम क्रमांकाचा सार्वजनिक वाहतूक संस्थेचा व स्वारगेट डेपोस इंधन बचतीचा राज्य स्तरावरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाला. याकामी श्री. कदम यांनी मुख्य समनव्यक म्हणून तर श्री. बुनगे यांनी रेकॉर्ड तयार करणे, पत्रव्यवहार करणे अशी महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडली.

सचिन गराडे, कंडक्टर क्र. ५५७६, कात्रज आगार
कामगिरी : दि. १४/०७/२०२१ रोजी मार्गावर कर्तव्य बजावत असताना बसमध्ये सापडलेली रोख रक्कम रुपये १०,०२०/- प्रामाणिकपणे कात्रज डेपोतील हेड क्वार्टरमध्ये जमा केली.

Leave a Reply

%d bloggers like this: