व्हॉट्सअॅपने भारतातील तब्बल 30 लाख खात्यांवर घातली बंदी
मुंबई : फेसबुकची मालकी असलेल्या मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅपने भारतातील 30 लाखांहून अधिक व्हॉट्सअॅप खात्यांवर बंदी घालण्यात आली आहे. 16 जून ते 31 जुलै या 46 दिवसांच्या कालावधीत ही कारवाई करण्यात आली आहे. खात्यासंबंधी 137 तक्रारी कंपनीला मिळाल्या होत्या. त्यापैकी एकावर कारवाई करण्यात आली तर उर्वरीत खात्यांवर बंदी घालण्यासाठी 316 विनंत्या करण्यात आल्या होत्या.
झी न्यूज’ने प्रसिद्ध केलेल्या बातमी नुसार व्हॉट्सअॅपने नवीन माहिती तंत्रज्ञान नियम, 2021 अंतर्गत तयार करण्यात आलेल्या अहवालात या विषयी माहिती दिली आहे. ‘भारताच्या कायद्यांचे किंवा व्हॉट्सअॅपच्या सेवा अटींचे आणि वापरकर्त्याचे अहवाल किंवा तक्रारींचे उल्लंघन केल्याबद्दल कंपनीच्या प्रतिबंध आणि शोध पद्धतीद्वारे भारतीय खात्यांवर कारवाई करण्यात आली. सेवेच्या अटी, किंवा व्हॉट्सअॅपवरील खात्यांविषयी प्रश्न, हेल्प सेंटरमध्ये प्रकाशित झाले आहेत किंवा, भारतीय तक्रार अधिकाऱ्याने पोस्टद्वारे प्राप्त केलेले मेल यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.’, असे कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे.
एकूणच, भारतात अशा प्रकारच्या 95 टक्के बंदी स्वयंचलित किंवा बल्क मेसेजिंग (`स्पॅम`) च्या अनधिकृत वापरामुळे आहेत. 2019 पासून ही संख्या देखील लक्षणीय वाढली आहे. आपल्या पहिल्या अनुपालन अहवालात, ज्यामध्ये 15 मे ते 15 जून दरम्यानचा काळ होता, व्हॉट्सअॅपने म्हटले होते की त्याने 2 दशलक्ष भारतीय वापरकर्त्यांवर बंदी घातली आहे. गूगलने सांगितले की, मे आणि जूनमध्ये आलेल्या तक्रारींच्या आधारे त्याने 1.5 लाखांहून अधिक सामग्री काढून टाकली आणि त्यातील 98 टक्के कॉपीराइटशी संबंधित आहेत.
