fbpx

Corona vaccination : आज देशात कोरोना लासिकरणाचा महाविक्रम

नवी दिल्ली : करोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर कोरोना लसीकरण कार्यक्रम जलद गतीने सुरू आहे. आज (31 ऑगस्ट) देशात 1.09 कोटीपेक्षा अधिक नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. आतपर्यंत एका दिवसातील कोरोना लसीकरणाच्या आकडेवारीतील हा उच्चांक आहे. स्वतः केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडावीया यांनी ट्वीट करत या महाविक्रमाची माहिती दिली आहे. तसेच यासाठी सर्व भारतीय नागरिकांचे अभिनंदनही केले आहे.

 

कोविन वेबसाईटच्या आकडेवारीनुसार देशात 65 कोटी 3 लाख 29 हजार 061 नागरिकांना कोरोना लस देण्यात आली आहे. यापैकी 50 कोटी 12 लाख 44 हजार 655 नागरिकांना पहिला डोस देण्यात आला आहे. तर 14 कोटी 90 लाख 84 हजार 406 नागरिकांना कोरोनाचे दोन डोस देण्यात आले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: