fbpx
Friday, April 19, 2024
ENTERTAINMENTLatest News

माधुरी दीक्षितच्या हस्ते ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’ लोकार्पण सोहळा संपन्न

फुलांची सजावट… ढोल ताशांचा गजर… राजेशाही थाट… उत्साहवर्धक वातावरण…. आणि या सगळ्या पारंपरिक सोहळ्यात ‘ती’ची दिमाखदार एंट्री. पण, ‘ती’ कोण असा प्रश्न तुम्हा सगळ्यांना पडला असेल? जिच्या सदाबहार हास्याने आजही जगभरातील चाहत्यांच्या हृदयाची धक् धक् वाढते अशी आपली मराठी मुलगी माधुरी दीक्षित. निमित्त होतं ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’च्या ॲप लाँचचे. मागील काही महिन्यांपासून ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार याची जोरदार चर्चा होती. या चर्चेला पूर्णविराम देत ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’ अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. माधुरी दीक्षितच्या हस्ते ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’चा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. या वेळी ‘प्लॅनेट मराठी’च्या ‘म’ या लोगोची पालखीतून मिरवणूकही काढण्यात आली. 

या भव्य कार्यक्रमाला ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’चे प्रमुख संस्थपक अक्षय बर्दापूरकर यांच्यासह  अमृता खानविलकर, तेजस्विनी पंडित, सिद्धार्थ जाधव, सोनाली कुलकर्णी, प्रसाद ओक, सचित पाटील, प्राजक्ता माळी, भार्गवी चिरमुले, गायत्री दातार, संजय जाधव, सोनाली खरे, सायली संजीव, सुरभी हांडे, निखिल महाजन, दीप्ती देवी, भाग्यश्री मिलिंद, रेशम श्रीवर्धनकर, सुशांत शेलार या तारे-तारकांनी हजेरी लावली होती.

 यापूर्वीच ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’वर राष्ट्रीय -आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांवर आपली मोहोर उमटवणारा ‘जून’ चित्रपट प्रदर्शित झाला असून यापुढे प्रेक्षकांना ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’वर ‘सोप्पं नसतं काही’, ‘हिंग पुस्तक तलवार’, ‘जॉबलेस’, ‘बाप बीप बाप’, आणि ‘परीस’ या वेगवेगळ्या धाटणीच्या वेबसिरीज आणि काही मनोरंजनात्मक आणि दर्जेदार चित्रपट पाहता येणार आहेत.  येत्या वर्षभरात तब्बल २४ वेबसिरीज प्रेक्षकांसाठी उपलब्ध होणार आहेत. सध्या ४० मराठी चित्रपटांचा आस्वाद प्रेक्षकांना घेता येणार असून पुढील तीन महिन्यांत ही संख्या सुमारे तिपट्टीहून अधिक असेल. 

अभिनेत्री माधुरी दीक्षित म्हणते, ”जगभरातील प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी केवळ मराठी ॲपची निर्मिती करणे, हे अक्षय बर्दापूरकर आणि त्यांच्या टीमने उचललेले एक कौतुकास्पद पाऊल आहे. त्यामुळे मराठी इंडस्ट्री एका वेगळ्याच उंचीवर पोहोचणार आहे. मराठी फिचर फिल्म्स आणि आशयामध्ये खूपच क्षमता आहे, जी अजून जगभरातील प्रेक्षकांनी अनुभवलेली नाही. या व्यासपीठामुळे चित्रपट निर्मात्यांना शोधणे आणि त्यांच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचणे अधिक सोयीस्कर होणार आहे. ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’ने प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा जो खजिना आणला आहे, तो खरोखरच आश्चर्यचकित करणारा आहे. या दर्जेदार कंटेन्टला तोड नाही.” 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading