इकोल स्पोर्ट्स फाऊंडेशन – केडन्स, मेट्रो संघांची विजयी आगेकूच

पुणे : केडन्स संघाने पीवायसी संघाला तर मेट्रो संघाने पूना क्लब संघाला पराभूत करताना इकोल स्पोर्ट्स फाऊंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या १९ वर्षांखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत आपली आगेकूच कायम राखली. 

पीवायसी मैदानावर झालेल्या लढतीमध्ये केडन्स संघाने पीवायसी संघाला ७ गडी राखून पराभूत केले. पीवायसी संघाकडून स्वप्नील शिंदे (२२) व अंजनेय पुराणिक (१०) यांनी लढत दिली. आर्य जाधव याने ३, प्रद्युम्न चव्हाण याने २ तर शुभम खरात याने एक गडी बाद केला. ६६ धावांचे आव्हान केडन्स संघाने १६.४ षटकांत पूर्ण करताना विजय साकारला. प्रद्युम्न चव्हाण याने २८, दिग्विजय पाटील यांनी १३ तर अर्षिन कुलकर्णी यांनी ११ धावा करताना संघाला विजय मिळवून दिला. अब्दस सलाम याने ३ गडी बाद केले.  

पावसामुळे डीव्हीसीए व डेक्कन जिमखाना तसेच २२ यार्डस व अँबिशियस या संघाच्या लढती होवू शकल्या नाहीत. 

संक्षिप्त धावफलक : पीवायसी १८.४ षटकांत सर्वाबाद ६५ (स्वप्नील शिंदे, २२, २ चौकार, अंजनेय पुराणिक १०, आर्य जाधव ३.४-०-१३-३, प्रद्युम्न चव्हाण ४-०-१२-२, शुभम खरात ४-०-१५-२) पराभूत वि. केडन्स १६.४ षटकांत ३ बाद ६६(प्रद्युम्न चव्हाण २८, ३ चौकार, दिग्विजय पाटील १३, २ चौकार, अर्शीन कुलकर्णी ११, १ चौकार, १ षटकार, अब्दस सलाम ४-०-११-३) सामनावीर : प्रद्युम्न चव्हाण, केडन्स

मेट्रो क्रिकेट क्लब : २२ षटकांत ९ बाद १२० (सार्थक वाळके २४, ३ चौकार,नीरज जोशी १७, २ चौकार, यश देशमुख १६, २ चौकार, रोहन नांबियार १५, २ चौकार, अखिलेश गवळे ५-०-३३-३, अशकन काझी ४-१-२३-२, ओम माळी २-०-११-२, अमन दोशी ५-१-२०-२) वि वि पुना क्लब २२ षटकांत सर्वबाद १११ (अखिलेश गवळे ४४, ३ चौकार, १ षटकार, निश्चय नवले १५ , २ चौकार, नीरज जोशी ५-०-२२-३, सिद्धांत लाळे ४-०-१७-२, जेसल पटेल ४-०-१३-१) सामनावीर : नीरज जोशी, मेट्रो क्रिकेट क्लब 

Leave a Reply

%d bloggers like this: