Pune – गणेश मंडळाना दोन स्वागत कमानींसाठी परवानगी

पुणे: शहरातील कोरोनाचे प्रमाण कमी झाले असले तरी कोरोना अजून पुर्ण पने संपला नाही.त्यामुळे त्याचे सावट उत्सवावर पडलेले दिसून येते.यातून गणेश उत्सव देखील सुद्धा सुटला नाही.मागील वर्षी गणेश उत्सव साजरा करण्यावर पूर्णपने बंदी घातली होती.त्यामुळे गणेश मंडळाचे अर्थकारण देखील कोलमडले होते.

मात्र या वर्षी मंडळाना गणेश बाप्पा पावनार आहे. महापालिकेने मागील वर्षी गणेश मंडळाना स्वागत कमानी घालण्यावर बंदी घातली होती.यावर्षी मंडळाना उत्सवासाठी त्याचे उत्सव मंडपाच्या प्रवेश दारा पासून 50 मीटर अंतरापर्यत दोन स्वागत कमानी उभारण्यास परवानगी देण्यात आली आहे. या साठी महापालिका प्रशासनाने नियमावली तयार केली आहे. लवकरच ही नियमवाली जाहीर केली जाईल.असे महापालिका प्रशासनाच्या वतीने सांगाण्यात आले.

Leave a Reply

%d bloggers like this: