“फिनिक्स: एक आत्मशोध” पुस्तकाचे प्रकाशन

पुणे : अंतर्नाद प्रकाशन तर्फे “फिनिक्स: एक आत्मशोध” ह्या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ संपन्न झाला. हे पुस्तक म्हणजे एका जीवघण्या अपघातातून जाऊन, खचून न जाता, धैर्याने आपल्या आयुष्याची विस्कटलेली घडी पुन्हा बसवण्याचे तपशीलवार आणि वस्तुनिष्ठ वर्णन आहे.

धनंजय गोडबोले व डॉ. मेघा देऊसकर हे या पुस्तकाचे लेखक आहेत. प्रकाशनाच्या कार्यक्रमाला प्रख्यात मनोविकार तज्ज्ञ आणि अभिनेते डॉ. मोहन आगाशे हे प्रमुख पाहुणे म्हणून, आणि प्रख्यात दिग्दर्शक सुनील सुकथनकर, अभिनिते सागर देशमुख आणि समाज सेविका स्वामिनी सावरकर ह्यांची विशेष उपस्थिती होती. ह्या पुस्तकात धनंजय यांच्या या शारीरिक मानसिक प्रवासाचे वर्णन करताना त्यात सहानुभूतीचाही स्वर नाही, आणि त्याच बरोबर त्यात व्यक्ती पूजाही केलेली नाहीये, तर ते एका तटस्थातेनी लिहिलंय, आणि असं लेखन वाचकांना वाचायला मिळावं असं डॉ. मोहन आगाशे यांनी या प्रसंगी सांगितलं. कोणत्याही आघातातून जाणाऱ्यांनी, डॉक्टर्स, नर्सेस, फिजिओथेरपिस्ट, आणि केअर गिवर्स, अशा सर्वांनी आवर्जून वाचावं आणि प्रेरणा घ्यावी असं हे पुस्तक आहे असं त्यांनी सांगितलं.

Leave a Reply

%d bloggers like this: