fbpx

मंदिरे चालू करण्यासाठी भाजपचे घंटानाद आंदोलन

पुणे :गेले तीन महिन्यांपासून राज्यातील मंदिरे बंद आहेत.अनेक सामाजिक संघटना, देवस्थानाचे विश्वस्त यांनी मंदिरे चालू करण्याची मागणी केली.पण राज्य सरकारने मंदिरे काही चालू केली नाहीत या कारणा मुळे भाजपने आज राज्यभर मंदिरे उघण्यासाठी घंटानाद आंदोलन केले.भाजप पक्षाच्या वतीने हे कसबा गणपती मंदिराच्या येथे हे आंदोलन करण्यात आले.या आंदोलनाचे नेतृत्व  भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केले.

आंदोलनाच्या वेळी राज्य सरकार मंदिरे उघडत नाही म्हणून राज्य सरकारचा निषेध भाजप ने केला.या आंदोलनाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक,खासदार गिरीश बापट ,आमदार मुक्ता टिळक , शहर सरचिटणीस सुनील माने, नगरसेवक धनंजय माने, भाजपचे प्रवक्ते संदीप खर्डेकर, राघवेंद्र बापू मानकर, महापौर मुरलीधर मोहोळ, कसबा मतदार संघा मधील भाजपचे कार्यकते, व पुणे शहरातील भाजपचे पदाधिकारी व कार्यकते,व पुणे महापालिकेतिल भाजपचे नगरसेवक उपस्थित होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले,राज्य सरकारने मंदिरे उघडली नाहीत पण राज्य सरकार दारूची दुकाने उघडते .पण मंदिरे नाही.या सरकारला लाज वाटली पाहिजे.लोक मंदिरे मध्ये जावोन देवाची प्रार्थना करतात.तेव्हा कुठे लोकांचे चांगले होते.हे सरकार सगळया गोष्टीत अपयशी ठरले आहे.कोरोना असू दे, किंवा वॅक्सिंनेशन मध्ये अपयशी ठरले आहे.यांच्या सरकार मधील मंत्री मोठ मोठे घोटाळा करतात. पण आमच्या सरकार मधील मंत्री थोडेसे काय बोलले तरी त्याना अटक करतात. आम्ही आज स्वतःहा मंदिरे उघडून पाया पडणार आहोत. आमच्या खटले दाखल झाले तरी चालतील.

जगदीश मुळीक म्हणाले,या महाविकास आघाडी सरकारला सुबुद्दी दे गेले 2-3 महिन्या पासून मंदिरे बंद आहेत.बाकी सगळे उघडले आहे .दारूची दुकाने उघडली आहेत.मंदिरे उघा डायला काही अडचण आहे. फक्त मंदिरे सोडून.सना सुदीत मंदिरे उघडी असायला पाहिजे होते.आम्ही राज्य सरकारचा निषेध करतो.या महाविकास आघाडी सरकार मधील मंत्र्यानि मंदिरे उघडून देण्याचे आश्वासन दिले होते.पण तसे केले त्यांनी तसे केले नाही.मंदिरे बंद आहेत म्हणून खूप जनाचे रोजगार बुडाले आहेत.म्हणून आम्ही आज आंदोलन करत आहोत.

 

Leave a Reply

%d bloggers like this: