गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या एसटी बसेस विश्रांतवाडी, येरवडा मार्गे सोडण्याची मागणी, उपमुख्यमंत्र्यांना निवेदन

पुणे – कोकणातील गणेशोत्सवाला एक परंपरा आणि खुप महत्व आहे. राज्यातील काना कोपऱ्यातुन चाकरमानी गणेश उत्सवाकरिता आपआपल्या गावी घरोघरी गणेश उत्सव साजरा करण्याची शेकडो वर्षांची परंपरा आहे. पिंपरी एसटी (वल्लभनगर एसटी डेपो) आगारातुन गणेशोत्सवासाठी कोकणात जाणारया एसटी बसेस या भोसरी, दिघी, कळस, विश्रांतवाडी, येरवडा मार्गे कोकणाकडे मार्गस्थ कराव्यात अशी मागणी राष्ट्रवादीचे विनोद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे.

कळस, विश्रांतवाडी, धानोरी आणि परिससरा मध्ये जवळपास ३० ते ४० हजार कोकणवासीय लोक वास्तव्यास आहेत. गेल्या अनेक वर्षांपासुन या भागातील कोकणवासींयांना आपआपल्या गावी जाण्यासाठी पिंपरी किंवा स्वारगेट एसटी स्थानकावरुन बुकिंग करावे लागत आहे जे खुप गैरसोयीचे आहे. पिंपरी एसटी आगारातुन (वल्लभनगर) कोकणाकडे जाणारया एसटी बसेस या सरळ दापोडी, खडकी, मार्गे स्वारगेट बस स्थानकातुन पुढे जातात, या मार्गावर अल्प प्रमाणास प्रवासी संख्या आहे. याच सर्व कोकणाकडे जाणारया एसटी बसेस भोसरी, दिघी, कळस, विश्रांतवाडी, येरवडा मार्गे वळविल्यास या भागातील कोकणस्थ बांधवाची मोठी सोय होऊ शकते व त्यांना मोठ्या गैरसोयीतुन सुटका मिळु शकते.

गेल्या अनेक वर्षांपासुन अनेक संघटनांनी विश्रांतवाडी भागातुन कोकणासाठी एसटी बसेस जाव्यात यासाठी प्रयत्न केलेले आहेत. परंतु पदरी निराशाच आली आहे.
पिंपरी एसटी आगारातुन कोकणाकडे जाणाऱ्या एसटी बसेस या भोसरी, दिघी, कळस, विश्रांतवाडी, येरवडा मार्गे वळविल्यास त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा येथे वास्तव्यास असलेल्या कोकणवासीयांना होऊन त्यांची गैरसोयीतुन सुटका होऊ शकते या मागणीवर सकारात्मक तोडगा काढण्याचे उपमुख्यमंत्र्यांनी आश्वास्त केले आहे. याप्रसंगी कोकण मराठा सेवा संघाचे जगदीश शिंदे, नारायणराव कदम, प्रकाश पालांडे, विजय देसाई, नचिकेत साळवी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: