किन्नर समाजाच्या सामाजिक , शैक्षणीक व आर्थिक विकासासाठी मी सदा लढा देईल – ऍड.रेणुका चलवादी

पुणे : किन्नर समाजाच्या सामाजीक , शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी मी सतत पाठीशी खंबीरपणे उभी राहून लढा देईल . असे वक्तव्य विद्यानगर पुणे येथील चलवादी शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित कार्यक्रम प्रसंगी ऍड. चलवादी यांनी व्यक्त केले .यावेळी त्यानी आपला वाढदिवस किन्नर समाजातील लोकांबरोबर साजरा केला व याप्रसंगी त्यांना अन्नधान्य ,छत्री व भेटवस्तू देऊन मैत्रीचा धागा बांधण्यात आला तसेच उपस्थित सर्वाचे आपघाती विमा योजना व शहरी गरीब योजनेचे फॉर्म भरून घेण्यात आले.

कार्यक्रमास माजी नगरसेवक हुलगेश चलवादी ,पुणे शहर राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अध्यक्षा आस्विनी परेरा ,माजी पोलीस पाटील अर्जुन टिंगरे ,गायक शिवाजी वाघमारे, क्रांती दनाने ,सुकांता आरोलीकर ,आकाश चलवादी, सतीश आगरवाल, विजय निशात ,आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विजय गायकवाड ,बाळासाहेब इमडे , अहमद नूरशे ,कासीम मुजावर ,निलेश धिवार ,सुमेध सोनवणे ,राहुल पवार ,प्रशांत पवार ,सुरेखा वाघमारे ,नागप्पा गुडुद्दवार ,दिव्या दनाने, नम्रता गावडे आदींनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

%d bloggers like this: