Wednesday, June 17, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

शिवसेना खासदार भावना गवळींच्या पाच संस्थांवर ईडीचे छापे

नागपूर : यवतमाळ – वाशीम लोकसभा मतदारसंघाच्या शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्या पाच शिक्षण संस्थांवर ईडीने छापे घातले आहे. भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी केलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

वाशिम जिल्ह्यातील रिसोडनजीकच्या देगाव येथे खासदार गवळी यांचा बालाजी पार्टीकल बोर्ड हा कारखाना आणि भावना पब्लिक स्कूल व डीएमएलटी कॉलेज आहे. तर शिरपूरला वरिष्ठ महाविद्यालय आहे. या सर्वच ठिकाणी ईडीने छापे घातले आहेत. बालाजी पार्टीकल बोर्डमध्ये निश्‍चितच काहीतरी गौडबंगाल आहे. पण शाळा आणि महाविद्यालयांत तसे काहीही नसल्याचे शिवसैनिक सांगत आहे. केंद्रातील भाजप सरकार ईडीचा दुरुपयोग करीत असल्याचा आरोपही शिवसैनिक करीत आहेत.

सोमय्यांनी वाशीम गाठून या प्रकरणाची माहिती जाणून घेतली होती. त्यावेळी खासदार गवळींच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड विरोध केला होता, त्यांच्यावर शाईसुद्धा फेकली होती. त्याचवेळी सोमय्यांनी गवळींना आव्हान दिले होते आणि ईडी, आरबीआयकडे तक्रार केली होती. सोमय्या यांनी गवळी यांच्यावर बालाजी पार्टीकल बोर्ड कारखान्यात १०० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. याबाबत त्यांनी अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड व पंकज चौधरी आणि सहकार राज्यमंत्री बी. एल. वर्मा यांची भेट घेतली होती. 

भावना गवळींचा १०० कोटींचा घोटाळा. १८ कोटी रोख रक्कम काढणे, कार्यालयात ७ कोटी रोख ठेवणे, बॅंकांना फसविणे आदी आरोप लावण्यात आले आहेत. गवळींच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली होती. त्याने चौकशी थांबेल, असे त्यांना वाटले असावे. पण आता त्यांचा हा भ्रम तुटला आहे. घोटाळे करण्याऱ्यांना पाठीशी घालण्याचे पाप राज्य सरकारने केले असल्याचे सोमय्यांनी म्हटले आहे.

दरम्यान,  काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून वाशीम जिल्ह्यात शिवसैनिक राष्ट्रीय महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदारांना पैसै मागत असल्याचा आरोप केला होता. ठेकेदार आणि शिवसैनिकांची ऑडिओ क्लिपही व्हायरल झाली होती. ते कार्यकर्तेही खासदार गवळींचेच होते. ते प्रकरण शांत होते न होते, तोच आता ईडीचा ससेमिरा त्यांच्या मागे लागला आहे. या कारवाई त्यांच्यावरील अडचणींत वाढ झाली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading