रोटरी क्लब ऑफ पुणे युवा व ओपेल प्रो तर्फे निर्माल्यापासून खत निर्मिती प्रकल्प

पुणे:यंदाच्या वर्षी पुणे शहरातील 100 सोसायटी ,गणेश मंडळाना या प्रकल्पात सहभागी करून घेण्याचे क्लबचे उद्दिष्ट आहे.योग्य प्रदधतिने केलेल्या निर्माल्य 
संकलन क्लबच्या वतीने सोसायटी, मंडळामध्ये जाऊन स्वीकारले जाईल .तसेच प्रकल्पाच्या ठिकाणीही नागरिकांना निर्माल्य समक्ष आणून देता येईल.या जमा झालेल्या निमाल्याचे पटवर्धन बाग येथे मशिनच्या सहाय्याने खतात रूपांतर केले जाईल .व गरजूनां विनामूल्य दिले जाईल.निमल्याचे योग्य वगीकरण करणाऱ्या सोसायटी/मंडळाना विशेष पुरस्काराने गौरवण्यात येईल .

गणेशोत्सवातील दहा दिवसांमधील मधील मोठ्या प्रमाणात जमा होणाऱ्या निर्माल्यापासून खत निर्मिती प्रकल्प व रोटरी क्लब ऑफ पुणे , प्रो स्क्रो यांच्या संयुक्त विद्यमाने व नगरसेवक जयंत भावे यांच्या सहकार्याने राबविला जाणार आहे. 11 सप्टेंबर 2021 रोजी संध्याकाळी चार वाजता पटवर्धन बाग टँकर पॉईंट एरंडवना येथे माजी आमदार व भाजप महिला मोर्चा राष्ट्रीय उपाध्यक्ष मेधाताई कुलकर्णी यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन होणार आहे अशी माहिती पुण्यातील पत्रकार परिषदेत रोटरी क्लब ऑफ पुणे युवाच्या प्रेसिडेंट तृप्ती नानल यांनी दिली .

रोटरी क्लब ऑफ पुणे युवा ऑपेल प्रो स्क्रो यांच्या संयुक्त विद्यमानाने निर्माल्यापासून खत निर्मिती प्रकल्प गेले चार वर्षे सातत्याने राबविला जात आहे.
निर्माल्यापासून तयार झालेले खत शेतकऱ्यांना विनामूल्य दिले जाईल. अशी क्लबच्या सेक्रेटरी दीपा बडवे यांनी सांगितले.
यमुनेचे पवित्र जपणे जल प्रदूषण रोखणे या उद्देशाने या प्रकल्पात सोसायटी गणेश मंडळी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन आपले योगदान द्यावे. व सामाजिक बांधीलकी जपावी असे आवाहन रोटरी क्लब पुणे इलेक्ट्रिसिटी प्रेसिडेंट सत्यजित निगडे यांनी केले.

Leave a Reply

%d bloggers like this: