मुलगी झाली म्हणून पत्नीचा गळा दाबून खून; पतीला अटक

पिंपरी :: पहिली मुलगी झाली म्हणून पत्नीचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना मावळ येथे घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी नराधम पतीला अटक केली आहे.
चांगुणा योगेश जाधव (वय-२०) असे खून झालेल्या मृत पत्नीचे नाव आहे. तर योगेश कैलास जाधव (वय-२६, धंदा- ड्रायव्हर, रा. चंदनवाडी, चांदखेड, ता. मावळ, पुणे) असे आरोपी पतीचे नाव असून, याबाबत शिवाजी दामु ठाकर (वय-४३, धंदा- मजुरी, रा. ठाकरवाडी, परंदवाडी, ता. मावळ, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत चांगुणा जाधव फिर्यादी शिवाजी ठाकर यांची मुलगी आहे. तिला ६ महिन्यांची मुलगी आहे. चांगुणाला पहिली मुलगी झाली म्हणून आरोपी पती तिला वेळोवेळी हाताने मारहाण करीत होता. शिवीगाळ व दमदाटी करून तिचा मानसिक छळ करीत होता. दि. २७ ऑगस्ट रात्री ८.०० ते २८ ऑगस्ट सकाळी ८.३० वा. च्या दरम्यान आरोपीने पत्नी चांगुणा झोपली असतानाच तिचा दोन्ही हाताने गळा दाबून खून केला. याप्रकरणी शिरगाव चौकीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शिरगाव चौकीचे पोलीस उप निरीक्षक गाडीलकर करीत आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: