समाजासाठी योगदान दिलेल्यांच्या स्मृती जतन करणे हीच आपली संस्कृती – महापौर मुरलीधर मोहोळ

पुणे : समाजासाठी योगदान दिलेल्या महनीय व्यक्तींची स्मृती जतन करणे हीच आपली संस्कृती असून, अश्या महत्वाची कामगिरी बजावलेल्या नागरिकांचे नावं विविध रस्ते, वास्तू,पूल अथवा अन्य स्थलांना देण्यामागे उदात्त भावना असल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले. शिक्षण समिती अध्यक्ष नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी एरंडवण्यातील कर्वे रस्त्याला जोडणाऱ्या रस्त्यास कारागृह अधीक्षक वासुदेव प्रभाकर पाळंदे पथ असे नामकरण करण्याचा समारंभ आयोजित केला होता त्यावेळी ते बोलत होते.एखाद्या सार्वजनिक रस्त्याला किंवा वास्तूला स्वतः च्या कुटुंबीयांचे नावं देणे ही भाजप ची कार्यपद्धती नाही आणि म्हणूनच मंजुश्री ताईंनी ह्या रस्त्याला पोलीस खात्यात मोठी कामगिरी बजावलेल्या वासुदेव पाळंदे यांचे नावं दिले हे अतिशय योग्य असल्याचे ही महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले.
ह्या भागात 60 वर्षांपेक्षा जास्तच काळ वास्तव्य केलेले वासुदेव पाळंदे यांना त्यांच्या पुण्यतिथी दिनी यथोचित आदरांजली अर्पण करावी असे मी ठरविले आणि हा रस्ता पाळंदे कुरियर ह्या नावाने परिचित होता त्यास आता अधिकृतरित्या वासुदेव पाळंदे पथ असे नामकरण केल्याने त्यांची स्मृती चिरंतन राहील असे नगरसेविका मंजूश्री खर्डेकर म्हणाल्या.
पाळंदे यांनी कारागृह अधीक्षक म्हणून बजावलेली कामगिरी स्पृहणीय असून भावी पिढी त्यांचे निश्चितच स्मरण करेल असेही मंजुश्री खर्डेकर यांनी स्पष्ट केले.ग्रँडमास्टर अभिजित कुंटे यांनी पाळंदे कुटुंबीयां सोबतच्या स्नेहसंबंधाना उजाळा दिला व एका प्रतिष्ठित व कर्तृत्ववान व्यक्ती चे ह्या पथाला नाव दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
कै. वासुदेव पाळंदे यांच्या नात  अश्विनी केळकर यांनी त्यांच्या जीवन कार्याचा परिचय करून दिला.ते नानासाहेब या नावाने प्रसिद्ध होते व त्यांनी स्वातंत्रपूर्व काळात धारवाड, हुबळी,वडोदरा, मुंबई, पुणे, नगर येथे 1958 पर्यंत कारागृह अधीक्षक म्हणून कार्य केले.कर्तव्यदक्ष व शिस्तप्रिय अधिकारी म्हणून त्यांची ख्याती होती.आज त्यांच्या कुटुंबातील यशवंत पाळंदे, गिरीप्रेमी चे अध्यक्ष आनंद पाळंदे, पुस्तक बांधणी तज्ज्ञ शिवाजी पाळंदे, आणि त्यांचा वारसा चालवीणारे आशिष, आदित्य, ऋषिकेश पाळंदे उपस्थित असून त्यांच्या कर्मभूमीत त्यांचे नावं एका पथाला दिल्याने आम्ही अनुग्रहित झालोय असेही त्यांनी सांगितले.
यावेळी ग्रँडमास्टर अभिजित कुंटे,नगरसेवक दिपक पोटे,नगरसेवक जयंत भावे,नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे, संदीप खर्डेकर, पुनीत जोशी, हर्षदा फरांदे,पल्लवी गाडगीळ, बाळासाहेब धनवे, निलेश गरुडकर, ऍड प्राची बगाटे उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: