संतापजनक; वंशाच्या दिव्यासाठी महिलेला नग्न करून अंगारा फासला

पुणे : वंशाला दिवा हवा म्हणून गर्भातच अर्भकाचा गळा आवळण्याचा सैतानी कृत्य काही महाभाग करत असतात, किंवा नवजात स्त्री अर्भकाला इतरत्र फेकून देतात, माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटना वारंवार घडतच आहे. त्यातच मुलगा (son) व्हावा म्हणून एका पतीने त्याच्या पत्नीच्या संपूर्ण शरीरावर भोंदूबाबाकडून आणलेला अंगारा फासून तिचा छळ केल्याची अत्यंत धक्कादायक घटना पिंपरी -चिंचवड (pimpari chinchvad) शहरात घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील म्हाळुंगे परिसरात ही घटना समोर आली आहे. ऋषिकेश सुदाम बोत्रे असं या नराधम पतीचे नाव आहे. त्याने आणि त्याच्या आईने हे कृत्य केलंय.

Leave a Reply

%d bloggers like this: