पर्यावरणपूरक गणेशमुर्ती प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न
पुणे: ‘आपणच बनवू या आपला गणपती आणि आपणच वाचवू या पर्यावरण’ या उद्देशाने पर्यावरणपूरक गणेशमूर्ती प्रशिक्षण कार्यक्रम पार पडला. पर्यावरण पूरक शाश्वत जीवनशैली व इको फ्रेंडली गणेशोत्सव याकरिता प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले होते. सोलापूरच्या युगंधर फाउंडेशन, पर्यावरण संस्कृती, पुणे च्यावतीने वनराई, पुणे यांच्या सहकार्याने पर्वती येथे प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
या कार्यशाळेसाठी सोलापूरचे प्रसिद्ध शिल्पकार विकास गोसावी, गणेश युग प्रशिक्षण दिले. या कार्यशाळेच्या माध्यमातून पीओपीच्या मूर्तीमुळे होणारे प्रदूषण, जलप्रदूषण व जलजीवनाची हानी याबाबत जनजागृती करण्यात आली. या कार्यशाळेला ३० विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते. तर ऑनलाइन १५० विद्यार्थी सहभागी झाले होते. सहभागी प्रशिक्षणार्थींना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी वनराई संस्थेचे सचिव अमित वाडेकर, जयवंत देशमुख, नगरसेविका अश्विनी कदम, प्रियंका माने, आसावरी गांधी आदी उपस्थित होते.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने होणारे जलप्रदूषण रोखण्यासाठी असा कार्यशाळा वेळोवेळी घेण्यात याव्यात माध्यमातून निसर्गाचे रक्षण व संवर्धनासाठी प्रोत्साहन मिळते असे मत नगरसेविका अश्विनी कदम यांनी व्यक्त केले.