डाॅ. प्रकाश मराठे यांची इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) महाराष्ट्र राज्य वरिष्ठ उपाध्यक्ष पदी निवड

पुणे : डाॅ. प्रकाश मराठे यांची इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) महाराष्ट्र राज्य वरिष्ठ उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड  करण्यात आली आहे. नुकतीच त्याबाबत घोषणा करण्यात आलेली आहे . नोव्हेंबर मध्ये ते कार्यभार सांभाळतील . सदर पदासाठी आय एम ए पुणे शाखेने त्यांना नामांकन दिलेले होते. सध्या ते राज्य आय एम ए , सोशल सिक्युरिटी स्किम चे मानद सचिव म्हणून कार्यरत आहेत . यापूर्वी त्यांनी राज्य आय एम ए चे सहसचिव म्हणून काम केलेले आहे.
तसेच त्यांनी इंडियन मेडिकल असोसिएशन पुणे, महाराष्ट्र राज्य नेत्रतज्ञ संघटना  आणि   पुणे नेत्रतज्ञ संघटना  या संस्थांचे अध्यक्षपद भूषविलेले आहे. नुकतेच ते इंडियन मेडिकल असोसिएशन पुणे  आणि पुणे नेत्रतज्ञ संघटना  या संस्थांच्या विश्वस्तपदी  निवडून आलेले आहेत.
यापूर्वी त्यांनी वैशिष्ट्यपूर्ण संकल्पनेद्वारे  राज्यभर वेगवेगळे समाजोपयोगी उपक्रम राबवलेले आहेत.आय एम ए  या संघटनेत ते सक्रिय असून या संघटनेच्या माध्यमातून अनेक नवनवीन उपक्रम राबवण्याचा त्यांचा मानस आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: