श्रीनिवास पाटील फाउंडेशन तर्फे भोजनाच्या पॅकेट्सचे वाटप 

वाई:   श्रीनिवास पाटील फाउंडेशन, सुरेंद्र पठारे फाउंडेशन व सहयोगी संस्थाच्या सहकार्यातून व गुरुद्वारा श्री गुरूसिंग सभा पुणे यांच्या मदतीने महालंगरचा आजच्या सलग चौथ्या दिवशी तयार भोजनाच्या पॅकेट्सचे वाटप जोर गावानजीक परिसरातील वाडी-वस्त्यांवरील तसेच गोसावी वस्ती, कातकरी वस्ती भागातील बाधवांना करण्यात आले.

श्रीनिवास पाटील फाउंडेशन व सहयोगी संस्थांचे कार्यकर्ते तसेच गुरुद्वाराचे सेवेकरी यांनी या पॅकेट्सचे आज प्रत्यक्ष जागेवर जाऊन वाटप केले. सामाजिक जाणिवेतून मदतीसाठी पुढे आलेल्या सर्व सेवाभावी संस्था व व्यक्ती यांच्या संयुक्त सहकार्यातून हे मदतकार्य सुरू असून अतिवृष्टी व भुस्खलनामुळे पीडित बांधवांना काही प्रमाणात आधार मिळत आहे. या वेळी वेळे गावातील विशाल हॉटेल चे मालक निलेश डेरे,श्रीनिवास पाटील फाउंडेशन चे कार्यकते उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: