fbpx

त्यांचेच मंत्री ऐकत नसतील तर केंद्राने कारवाई  केली पाहिजे -उदय सामंत


पुणे:काही लोकांना मुख्यमंत्र्यांच ऐकता येतनसेल तर केंद्राने कारवाई गरजेच आहे.तिसरी लाट येणार म्हणून काळजी घेतली पाहिजे.जनाशीर्वाद यात्रा लोकांच्या आशीर्वादासाठी घेतली पाहिजे,एकीकडे केंद्र सांगत कोरोना नियम पाळले पाहीजेत .तर दुसरीकडे त्याचेच मंत्री ऐकत नसतील तर केंद्राने कारवाई  केली पाहिजे. असा टोला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदे मध्ये नारायण राणे यांना लगावला.

जनाशीर्वाद यात्रा लोकांच्या आशिर्वादासाठी असावी पण या यात्रेत फक्त मुख्यमंत्र्यांवर टीका केली जात आहे.पण महागाई इतर प्रश्नावर बोललं जातं नाहीय.पण मुख्यमंत्र्यांवर टीका केली तर काय होत हे महाराष्ट्रातील जनतेने पाहिलं आहे.जनाशीर्वाद यात्रा लोकांच्या हितासाठी असली पाहिजे. असाही टोला उदय सामंत यांनी नारायण राणे यांना लगावला .

मंत्री आदित्य ठाकरे यांनी अफगाणिस्तान मधील मुलाशी चर्चा केली होती .त्याच्या सांगण्यावरून आपण या विद्यार्थ्यांबाबत काय करू शकतो यावर चर्चा करण्यासाठी आलो आज चर्चा केली.महाराष्ट्र राज्याच्या परंपरेंनुसार आम्ही या विद्यार्थ्यांच्या पाठीशी आहोत,.पुण्यात ५४१ विद्यार्थ्यांना कसे आणता येईल याचा प्रयत्न सुरू आहेत,.राज्य सरकारने जर अफगाणिस्तान मधील मुलाचा राहणे खाणे याचा खर्च करण्याची तयारी काही महाविद्यालयाने दाखविली आहे.महाराष्ट्र शासन अफगाण मुलाच्या पुर्णपणे पाठीशी राहील  .असे उदय सामंत म्हणाले .

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्क बाबत आम्ही बैठक आयोजन करत आहोत पुणे विद्यापीठ आणि इतर विद्यापीठे एकत्र येऊन या विद्यार्थ्यांना मदत करतील,त्याच्यावर कुठलाही अन्याय होणार नाही याची दक्षता महाराष्ट्र शासन घेईल .असेही उदय सामंत म्हणाले. सीईटी तारखा जाहीर केल्या होत्या काही तांत्रिक कारणामुळे वेळ, केला,केंद्र वाढवून येत्या काही दिवसात निर्णय होईल असे सामंत म्हणाले .

Leave a Reply

%d bloggers like this: