पीएमपी तर्फे प्रशिक्षणार्थी पदासाठी अर्ज मागविले  

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी) मध्ये सन २०२१-२२ या वर्षाकरीता विविध ट्रेडसाठी एकूण ३९५ प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांकडून १ वर्ष कालावधीकरिता शिकाऊ प्रशिक्षणार्थी (अप्रेंटीस) म्हणून अर्ज मागविण्यात येत आहेत, अशी माहिती परिवहन महामंडळाकडून पत्रकाद्वारे कळवण्यात आली आहे. सदरची ही प्रक्रिया हि नोकरभरती नसून केवळ प्रशिक्षणार्थी (अप्रेंटीस) चा प्रशिक्षण / ट्रेनिंग / फिल्ड ट्रेनिंग कालावधी फक्त १ वर्षाकरिता आहे. सदरच्या १ वर्षाच्या प्रशिक्षण कालावधीसाठी इच्छुक उमेदवारांनी अप्रेंटीस पोर्टलवर रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य आहे. इच्छुक उमेदवारांनी सर्व कागदपत्रांसह आवक-जावक विभाग, पीएमपीएमएल कार्यालय, स्वारगेट, पुणे येथे दि. ३१ ऑगस्ट 2021 पर्यंत अर्ज सादर करावेत, असे पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. यांनी पत्रकात नमूद केले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: