माझ्या व्यक्तव्याला आपल्या घाणेरड्या अजेंड्याचे माध्यम बनवू नका- सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा 

मुंबई : टोकियो ऑलम्पिकमध्ये भारतासाठी सुवर्ण पदकाची कमाई केलेल्या नीरज चोप्राचे सगळीकडून कौतुक होत आहे. मात्र याच सुवर्ण कामगिरी करणाऱ्या निराजला ‘माझ्या व्यक्तव्याला आपल्या घाणेरड्या अजेंड्याचे माध्यम बनवू नका’, असे म्हणत भारतीयांना आवाहन करण्याची वेळ आली आहे. आज ट्विटर वर एक व्हिडिओ पोस्ट करीत निरजने हे आवाहन केले आहे. ऑलम्पिक खेळादारम्यान पाकिस्तानी भालाफेकपटूने त्याचा भाला वापरल्यावरुन काही जणांनी अयोग्य कमेंट्स केल्या होत्या. त्यावर खुलासा करीत निरजने आपली बाजू मांडली आहे.

निरजने या व्हीडिओमध्ये म्हंटले आहे की, “आपण सर्वांनी भरभरून प्रेम दिल त्याबद्दल आभार. खूप छान वाटतंय. मात्र एक गोष्ट बोलायची आहे की, माझ्या जेवलिन थ्रोच्या आधी पाकिस्तानच्या अरशद नदीमकडे माझा जेवलिन होता, त्याच्याकडून मी जेवलिन मागितला, असे एका मुलाखतीत मी म्हटलं होतं. या गोष्टीचा आता मोठा मुद्दा केला जात आहे. मात्र आम्ही सगळे खेळाडू आमचे वैयक्तिक जेवलिन तिथे ठेवतो. आम्ही एकमेकांचे जेवलिन वापरु शकतो, असा नियम आहे. त्यावेळी अरशद जेवलिन घेऊन त्याच्या थ्रोची तयारी करत होता. तेव्हा मी माझ्या थ्रो साठी त्याच्याकडे जेवलिन मागितला. याला काही लोकांनी मोठा मुद्दा बनवला आहे. माझा वापर करुन याचा मुद्दा बनवला जात आहे. आम्ही सर्व खेळाडून आपापसात मिळून मिसळून राहतो, त्यामुळं अशी वक्तव्य करु नका, ज्यामुळं आम्हाला वाईट वाटेल.”

Leave a Reply

%d bloggers like this: