चंद्रकांत पाटील यांच्या आमदार निधीतून विविध विकासकामांचा शुभारंभ

पुणे :कोरोनामुळे ठप्प असलेल्या विकासकामांना गती मिळाली असून, आमदार चंद्रकांत पाटील यांच्या विकासनिधीतून कोथरुड, बाणेर पाषाणमधील विविध विकासकामांचा मंगळवारी शुभारंभ करण्यात आला. यात प्रामुख्याने ड्रेनेज लाईन टाकणे, विद्यार्थी व महिलांसाठी अभ्यासिका बांधणे, पाण्याची टाकी बसवणे यांसह विविध विकासकामांचा समावेश आहे.

आमदार चंद्रकांत पाटील यांनी आपल्या विकासनिधीतून अनेक विकासकामे मंजूर झाली असून, त्यापैकी काही कामांचा शुभारंभ मंगळवारी करण्यात आला. यात प्रामुख्याने प्रभाग क्रमांक 12 मधील वनाज शाळा- कोथरुड येथे पाण्याची टाकी बसवणे, प्रभाग 8 येथील पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालयात महिलांसाठी शौचालय उभारणे, प्रभाग 13 मध्ये सिटी क्राऊन सोसायटी येथे ड्रेनेज लाईन टाकणे, प्रभाग 13 मधीलच स्नेहा सहकारी संस्था म्हाडा कर्वेनगर येथे रस्त्याचे डांबरीकरण, प्रभाग क्रमांक 12 मधील वनाज शाळा येथील शौचालयाचे नुतनीकरण, प्रभाग क्रमांक 12 डहाणूकर कॉलनी मधील लक्ष्मीनगरमधील गल्ली क्रमांक 1 ते 22 मध्ये ड्रेनेज लाईन टाकणे, प्रभाग क्रमांक 9 पाषाण मधील पंचशील नगर येथे सामाजिक सभागृहाच्या पहिल्या मजल्याचे बांदकाम, प्रभाग 12 डहाणूकर कॉलनी मधील लक्ष्मीनगर येथील निळा झेंडा चौक येथे स्वच्छता गृहावरील विद्यार्थी व महिलांसाठी अभ्यासिका बांधणे आदी कामांचा समावेश आहे.

दरम्यान, यापूर्वी बाणेर आणि पाषाण भागातही आमदार चंद्रकांत पाटील यांच्या आमदारनिधीतून सहा बस स्टॉप उभाराण्यात आले. तर बाणेर-नणावरे वस्ती येथे ओपन जिम उभारण्यात आली असून, त्याचे लोकार्पण स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला करण्यात आले.

Leave a Reply

%d bloggers like this: