जॅझमटाझ वर्ल्डच्या मिस्टर अँड मिस पुणेला २५ वर्ष पुर्ण, रौप्य मोहत्सवाच्या औचित्यावर  २०२१ च्या स्पर्धेची तारीख व ऑडिशन्स जाहीर

पुणे : साथीच्या आजारांनंतर आता थोडी चांगली बातमी घेऊन येत आहे या वर्षातील बहुप्रतिक्षित इव्हेंट मिस्टर अँड मिस पुणे २०२१ . त्यांनी आपल्या रौप्य महोत्सवाच्या औचित्यावर स्पर्धेचे तपशील, या वर्षीच्या स्पर्धेच्या तारखा आणि ऑडिशन जाहीर केले आहेत.

या वर्षीच्या स्पर्धेसाठीचे ऑडिशन २९ ऑगस्ट रोजी क्लब २४ उंड्री येथे आणि १ सप्टेंबर रोजी जय हिंद स्टोअर्स येथे आयोजित केले जातील. हा कार्यक्रम जॅझमटाझ इव्हेंटचे साजिद शेख यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे, ते गेल्या २९ वर्षांपासून स्पर्धांचे आयोजन करत आहे आणि या शहरला विजेता देण्यात अग्रेसर आहेत. ग्रँड फिनाले ५ सप्टेंबर २०२१ रोजी हॉटेल प्राइड येथे आयोजित केला जाईल जेथे विजेत्यांना मुकुट घालण्यासाठी सेलिब्रिटी उपस्थित असतील. याप्रसंगी बोलताना साजिद शेख, सीईओ जॅझमटाझ म्हणाले, “आमच्या फर्मच्या च्या २५ व्या वर्षांच्या रौप्य महोत्सव वर्षी मिस्टर अँड मिस पुणे २०२१ सोहळ्याची घोषणा करताना मला खूप आनंद होत आहे. आम्ही पुण्यातुन ऑडिशनसाठी एकूण ५० हून अधिक स्पर्धक येण्याची अपेक्षा करत आहोत. त्यांच्यातुन एकूण 15 मुलींची निवड करू. स्पर्धेपूर्वी आमच्या सहभागी तज्ञ पॅनेलद्वारे सर्व सहभागींना तयार केले जाईल आणि प्रत्येक विजेत्याला संधीबरोबरच मॉडेलिंग आणि फॅशनच्या जगात एक व्यासपीठ मिळेल जो त्यांच्यासाठी एक महत्वाचा टप्पा असेल. ”

 या पत्रकार परिषदेला जॅझमटाझ इव्हेंट्सचे साजिद शेख, सॅम चर्चिल ऑफिशीयल कोरिओग्राफर, मिस्टर पुणे – प्रितीश गुमाणे ,मिसेस महाराष्ट्रा – राधिका सुधीर आणि जयहिंदच्या सचित जैन यांनी संबोधित केले.

ऑडिशनसाठी प्रवेश फॉर्म पीएमसी आणि पीसीएमसी च्या सर्व जयहिंद स्टोअरमध्ये उपलब्ध असतील. अधिक माहितीसाठी ९८९०६२७३२३ या क्रमांकावर संपर्क साधू शकता.हा  जॅझमटाझ वर्ल्डचा इव्हेंट आहे.

.

Leave a Reply

%d bloggers like this: