बँकेचे हप्ते व वर्षाचा टॅक्स कमी करावा टूर्स अँड ट्रॅव्हल व्यवसायिकांची मागणी

पुणे: कोरोनामुळे सगळे मागील दीड वर्षापासून सगळे धंदे बंद होते. सगल्या धंद्यांचे नुकसान झाले. काहींचे रोजगार पण गेले. अशातच पर्यटकांना पर्यटन स्थळी व ईतर स्थळी घेऊन जाणारे टूर्स अँड ट्रॅव्हल्स चा व्यवसाय करणारे व्यवसायिका चे पण आर्थिक कंबरडे मोडले आहे. अशातच टूर्स अँड ट्रॅव्हल्स चा व्यवसाय करणारे व्यवसायिक यांनी पत्रकार परिषदेत आपली व्यथा मांडली आहे.

शरयू टूर्स अँड ट्रॅव्हल्स चे मालक उमेश  माझगावकर  म्हणाले मी पुणे शहरात टूर्स अँड ट्रॅव्हल्स अर्थात कॉल सेंटर, आयटी कंपनी  देवस्थानांना लागणारी वाहने भाडेतत्वावर देण्याचा व्यवसाय करतो. पण गेल्या दीड वर्षापासून ते आत्तापर्यंत माझ्यासारख्या व महाराष्ट्रातील लाखो गाडी चालक, मालक व्यवसायिकांना या कोरोना विषाणूमुळे फटका बसला असून सध्या कोणत्याही प्रकारचा इन्कम सोर्स होत नाही.

गाडीचे हप्ते ,आरटीओ चा खर्च ,ड्रायव्हर चा पगार, मुलांचे शिक्षण व इतर खर्च भागविणे अशक्‍य झाले आहे. तरी या अडचणी सरकारी दरबारी पोहोचण्यासाठी मी लोकशाही पद्धतीने रीतसर अर्ज पोलीस आयुक्तालयात केला आहे. परंतु आमची मागणी अजूनही मान्य केली नाही ती मागणी मान्य करावी अशी माहिती  पुण्यातील पत्रकार परिषदेत शरयू टूर्स अँड ट्रॅव्हल्स चे मालक उमेश माझगावकर यांनी दिली.

Leave a Reply

%d bloggers like this: