प्रीमियम गेमिंग अनुभवासाठी ‘ट्रूक’ने भारताची पहिली गेमिंग रेंज टीडब्ल्यूएस लॉन्च केली

साऊंड उपकरणे तयार करणारा भारताचा अग्रगण्य ऑडिओ ब्रँड ‘ट्रूक’ने दर्जेदार उत्पादनांच्या श्रेणीत भर घालताना प्रीमियम गेमिंग अनुभव प्रदान करण्यासाठी बॉर्न टू गेम सिरीजमध्ये बीटीजी १ आणि बीटीजी २ या नवीन जोडीचा समावेश असलेली भारताची पहिली गेमिंग-रेंज टीडब्ल्यूएस लॉन्च केली आहे. बीटीजी १ फ्लिपकार्टवर उपलब्ध तर बीटीजी २ अमेझॉनडॉटइन वर १९९९ रुपयांत उपलब्ध आहे. हे उत्पादन रॅडियन्ट डिझाइन आणि आधुनिक ट्रायबल डिझाईनमध्ये उपलब्ध असून भविष्यातील एक अतुलनीय गेमिंग अनुभवाचे वचन देते.

ट्रुकचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज उपाध्याय म्हणाले, ” टीडब्ल्यूएस आणि सोनिक अ ऑक्सेसरीजमध्ये ट्रुकने अगोदरच अढळस्थान निर्माण केले आहे.  आम्ही भारतातील वाढत्या गेमिंग चाहत्या वर्गाची पूर्तता करण्यासाठी आमची नवीन टीडब्ल्यूएस उत्पादन श्रेणी, बॉर्न टू गेम (बीटीजी) सुरू करीत आहोत ती ही अविश्वसनीयपणे परवडणाऱ्या किंमतीत. उत्पादने सर्व साऊंड सपोर्ट वैशिष्ट्याने भरलेली आहेत ज्यासाठी प्रीमियम गेमिंग अनुभव असणे आवश्यक आहे.”

उत्पादनाची वैशिष्ट्ये:

गेमिंग-केंद्रित वैशिष्ट्ये: बीटीजी १ आणि बीटीजी २ टीडब्ल्यूएस दोन्ही उच्च-परफॉर्मन्स गेमिंग-कोअर चिपसेटसह वाढीव ध्वनी गुणवत्तेसह पॅक आहेत. या टीडब्ल्यूएसमध्ये ३२ बिट आरआयएससी आर्किटेक्चर आणि एन्व्हायर्नमेंटल नॉइज कॅन्सलेशन (ईएनसी) आहे जे प्रतिध्वनी, वारा आणि आवाजातील गोंगाट काढून टाकते.

प्रीमियम साऊंड क्वालिटी: गेमिंग टीडब्ल्यूएसमध्ये बेस्ट-इन-क्लास ६० एमएस अगम्य कमी लेटन्सी आणि ड्युअल मोड कॉन्फिगरेशनचे एक अद्वितीय संयोजन आहे, जे वापरकर्त्यांना संगीत मोड आणि गेमिंग मोडदरम्यान सहजपणे बदल करण्यात सक्षम करते. म्युझिक मोडमध्ये हाय-फाय ऑडिओ क्वालिटी फीचर आहे.

मजबूत बॅटरी: दोन्ही टीडब्ल्यूएसमध्ये एक अविश्वसनीय दीर्घकाळ टिकणारी बॅटरी-लाईफ आहे जे एकाच चार्जवर १० तासांपर्यंत प्लेटाइम आणि केससह एकूण ४८ तासांपर्यंत प्लेटाइमचा अनुभव देते. केससह ३-४ वेळा केलेल्या चार्जिंगमधून १८० तास स्टँडबाय बॅटरी लाईफ मिळते.  टीडब्ल्यूएस डिव्हाइसचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे टिकाऊ टाइप-सी चार्जिंग पोर्ट, जो ओव्हरचार्जपासून बॅटरीला संरक्षण देतो आणि वीजेचा वापरही कमी करतो.

डिझाइन: या एर्गोनॉमिकली डिझाइनमुळे सुरक्षित फिट आणि फेदर लाइट गेमिंग बड्सचे वजन फक्त ४ ग्रॅम आहे आणि ते सर्व दिवसभर कानांना आराम प्रदान करण्यासाठी डिझाइन केले गेले आहे, तर ४५ अंशांच्या युनिक अँगलमुळे ते फिट बसतात.

Leave a Reply

%d bloggers like this: