लसीकरणाचा शिवधनुष्य पेलणाऱ्यांचे कार्य कौतुकास्पद – चंद्रकांत पाटील

पुणे : लसीकरणाचे कार्य खूप महत्वाचे होते जेणेकरून कोरोनावर नियंत्रण मिळविणे शक्य झाले, हे शिवधनुष्य पेलणाऱ्यांचे कार्य कौतुकास्पद असून अश्यांचा सत्कार करताना मला मनस्वी आनंद होत आहे असे गौरोवोदगार भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काढले.

शिक्षण समिती अध्यक्ष नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी प्रभाग 13 मधील पंडित दीनदयाळ उपाध्याय शाळेतील लसीकरण केंद्रात ही जबाबदारी पार पडणाऱ्या वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी व सहाय्यक यांचा कौतुक समारंभ आयोजित केला होता त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी भाजप प्रदेश सरचिटणीस अतुल सावे, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर,भाजप शहर प्रवक्ते संदीप खर्डेकर, नगरसेवक दीपक पोटे, पुनीत जोशी, माधुरी सहस्त्रबुद्धे,नगरसेवक जयंत भावे, मिताली सावळेकर,बाळासाहेब टेमकर व वैभव मुरकुटे, हर्षदा फरांदे,  प्रशांत हरसुले, अनुराधा एडके, राजेंद्र येडे, प्राची बगाटे, कल्याणी खर्डेकर,रुपाली मगर,अपर्णा लोणारे, रामदास गावडे,श्रीकांत गावडे,अमोल डांगे, गिरीश खत्री उपस्थित होते. 

यावेळी पाटील  म्हणाले ” सुरवातीच्या काळात नागरिक लसीकरण करून घेण्यास तयार नव्हते, अल्प प्रतिसाद मिळतं होता मात्र कालांतराने नागरिकांचा लसीकरणवरील विश्वास वाढला आणि हे संकट थोपविण्यासाठी लसीकरण केले पाहिजे हे लोकांना पटले आणि मग केंद्रावर प्रचंड गर्दी झाली. अश्या वेळीकेंद्रावर प्रत्यक्ष लसीकरण करणारे हात मौल्यवान कामगिरी बजावत असून समाजाने त्यांचे ऋण मानले पाहिजे. काही लोक म्हणतील की त्यांना त्यांच्या कामाचा पगार मिळतो पण पगार मिळतं असला तरी कोरोनाचा धोका सर्वांनाच समान असून त्या संकटकाळात काम करण्याचे धाडस करणाऱ्यांचा सन्मान करणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले.

Leave a Reply

%d bloggers like this: