रोटरी इंटरॅक्ट क्लबचे पदग्रहण

पुणे: महाराष्ट्र कॉस्मोपोलिटन एज्युकेशन सोसायटीच्या अँग्लो उर्दू बॉईज हायस्कूल येथे इंटरॅक्ट क्लबचा पदग्रहण समारंभआयोजित करण्यात आला .या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून रोटरी क्लब ऑफ पुणे सेन्ट्रलचे अध्यक्ष अमिताभा मुखोपाध्याय उपस्थित होते.प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती परवीन शेख यांनी प्रमुख पाहुण्यांचे यथोचित स्वागत केले. इंटरॅक्ट क्लबच्या मावळत्या अध्यक्ष झिकरा बुखारी हिने नवीन अध्यक्ष खतीजा पटेल यांच्याकडे नवीन वर्षाच्या कार्यभार सुपूर्द केला.या कार्यक्रमास डॉ.एन वाय काझी, वनिता बजाज,अमिता मुनोत यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाच्या प्रशालेच्या इंटरॅक्ट क्लबच्या प्रमुख नीलिमा साठे यांनी आभार मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सना, रुखसाना, अमरीन, यमिन व तझिन यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

%d bloggers like this: