कॅथलीक असोसिएशन ऑफ पुणे यांच्या वतीने मिरज तालुक्यातील पूरग्रस्त कुटुंबांना मदत

पुणे : ख्रिश्चन समाजातील सामाजिक व धार्मिक उपक्रमात अग्रेसर असणाऱ्या कॅथलीक असोसिएशन ऑफ पुणे यांच्या वतीने मिरज तालुक्यातील पूरग्रस्त कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू तसेच आवश्यक साहित्यांचा पुरवठा करण्यात आला. पुणे विभाग अंतर्गत सांगली पुरवठा अधिकारी शिल्पा ओसवाल यांच्यासोबत चर्चा करून माळवाडी व सावळवाडी या दोन पूरग्रस्त गावांमधील सुमारे दीडशे कुटुंबांना ही मदत देण्यात आली. अन्नधान्यांचे किट, ब्लँकेट, बेडशीट, कपडे व इतर आवश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. यासाठी प्रशासनाच्यावतीने तलाठी, सरपंच, कोतवाल यांनी बहुमोल सहकार्य केले.

त्या सामाजिक उपक्रमासाठी पुणे धर्म प्रांताचे बिशप डॉ. थॉमस डाबरे, संस्थेचे अध्यात्मिक सल्लागार फादर जॉर्ज डिसोजा, युवा संचालक फादर स्टॅन्ली फर्नांडिस, फादर माल्कम यांनी आशीर्वाद व शुभेच्छा दिल्या. डिवाइन मर्सी चर्चचे फादर राजेश, सेंट स्याबस्टीन शाळेचे फादर डेनिस, डि नोबली कॉलेजचे फादर जेकब यांच्यासह प्रकाश काळे, दीपक पवार, आशा जेवियर यांनी बहुमोल सहकार्य केले.

संस्थेचे अध्यक्ष ज्यो कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली जोसेफ पॉल, पॉल टेलिस, जेव्हीयर डिसिल्वा, वडगावशेरी शाखेचे अँथोनी डीक्रूझ, संजय तांबे, जॉर्ज बेंजमिन यांनी हा उपक्रम यशस्वी करण्याकरिता परिश्रम घेतले.

Leave a Reply

%d bloggers like this: