म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टतर्फे गरजू विद्यार्थ्यांना १ हजार वह्या  

पुणे : अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टतर्फे गरजू विद्यार्थ्यांना १ हजार फुलस्केप वहयांची मदत देण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन मंडईमध्ये बुरुड आळीमध्ये करण्यात आले होते.श्रद्धेला सामाजिकतेची जोड देत वर्षभर राबविलेल्या उपक्रमांमुळे १६ वर्षात उत्सवाने पुण्याच्या सांस्कृतिक पटलावर वेगळे स्थान निर्माण केले आहे. धार्मिकतेसोबत विधायक उपक्रम हे उद््दीष्ट समोर ठेऊन ट्रस्टने कोविड काळात हा उपक्रम राबविला.
मोजक्या लोकांच्या उपस्थितीत आॅनलाईन पद्धतीने हा कार्यक्रम झाला. यावेळी भारतीय जनता पार्टी पुणे शहर उपाध्यक्षा स्वरदा बापट, ट्रस्टचे विश्वस्त उपाध्यक्ष निवृत्ती जाधव, नितीन जाधव, विश्वस्त अध्यक्ष राहुल सुर्यवंशी, विजय जाधव, राजू परदेशी, सुधीर साकोरे, योगेश निकम, हर्षद पोरे, दिनेश पिसाळ, अक्षय ढमढेरे आदी उपस्थित होते. मंडई परिसरासह पुणे शहराच्या विविध भागांतील गरजू विद्यार्थ्यांना या वह्यांचे वाटप करण्यात आले.
स्वरदा बापट म्हणाल्या, गरजू व गरीब मुलांना वह्यांसारखे शैक्षणिक साहित्य मोठया प्रमाणावर वापरता येत नाही. वर्षभर आवश्यक तेवढेही साहित्य त्यांच्याजवळ नसते, त्यामुळे ते साहित्य त्यांना देण्याच्या उपक्रमातून म्हसोबा ट्रस्टने वेगळा आदर्श घालून दिला आहे. धार्मिकतेसोबत सामाजिकता जपणारे हे ट्रस्ट असून समाजोपयोगी कार्यक्रम हे वैशिष्टय आहे.
निवृत्ती जाधव म्हणाले, ज्यांना मिळत नाही, त्यांना आपण समाजाचे देणे लागतो या भावनेने परतफेड करण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. आई-वडिलांनी आपल्याला कसे वाढविले, कसे शिकविले हे लक्षात ठेऊन मोठे झाल्यावर इतरांना मदत करावी. कोणत्याही संकटातून दूर जाणे आपल्या हातात असते. कोरोनाच्या संकटातून बाहेर पडणे किंवा त्यामध्ये राहणे हे आपल्याच हातात आहे. त्यामुळे ट्रस्टने जशी विद्यार्थ्यांना आत्ता मदत दिली आहे, तशी त्यांनी इतर गरजूंना भविष्यात द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

Leave a Reply

%d bloggers like this: