भविष्यात पीएमपी मधून मोफत प्रवासासाठी प्रयत्नशील – चंद्रकांत पाटील

पुणे : पुणे महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यापासून आम्ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूतीकरणावर लक्ष केंद्रित केले आहे. म्हणूनच पीएमपीएमएल मार्फत १० रुपयांत प्रवास ही योजना आम्ही आणली आहे. भविष्यात पीएमपीएमएल मधून मोफत प्रवासासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत, असे मत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

नगरसेवक प्रकाश ढोरे यांना पीएमपीचे संचालक पद मिळाल्याबद्दल त्यांचा औंध – बोपोडी येथील कार्यकर्त्यांच्या वतीने प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील  तसेच शहर अध्यक्ष जगदीश मुळीक पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. भाजप पुणे शहर चिटणीस सुनील माने यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी ते बोलत होते.

 या कार्यक्रमात भाजप पुणे शहर चिटणीस सुनील माने यांच्या कार्यअहवालाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच प्रभाग क्रमांक आठ मधील उत्कृष्ठ काम करणाऱ्या माणिक गायकवाड, सुनीता रावत, अंबिका कोळी, रेणुका रेटवडे, सुदेश जाधव, अशोक कदम, दशरथ भालेराव, सुप्रिया चौधरी या शक्तिकेंद्र प्रमुखांचा सत्कार ही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

कार्यक्रमाला आमदार सिध्दार्थ शिरोळे, शहर संघटन सरचिटणीस राजेश पांडे, प्रवक्ते संदिप खर्डेकर, शहर उपाध्यक्ष डॉ. श्रीपाद ढेकणे, पुनित जोशी, माजी महापौर सुरेश शेवाळे, आनंद छाजेड, गणेश स्वामी, रमेश नाईक, सचिन घोरपडे, अंकल रावत, अविराज हुगे, रोहित भिसे, अजित पवार, सुनील दैठणकर, जितेंद्र गायकवाड, योगेश केरकर,सिद्धार्थ गायकवाड, संतोष भिसे, अरुण बागडी, अनिल माने, प्रतीक वाघमारे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

शहरअध्यक्ष जगदीश मुळीक म्हणाले, प्रकाश ढोरे यांना शहराची चांगली माहिती आहे त्यामुळे त्यांच्या रूपाने पीएमपीएमएलसाठी योग्य संचालक मिळाला असल्याचे मत व्यक्त केले. शक्तिकेंद्र प्रमुख हा पक्षाचा आत्मा असल्याने त्यांना सन्मानित करणे गरजेचे असल्याचेही मत त्यांनी व्यक्त केले.

आमदार सिद्धार्थ शिरोळे म्हणाले, भारतीय जनता पक्ष सत्तेत आल्यापासून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूती बरोबरच ही व्यवस्था पर्यावरण पूरक करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. पुण्याच्या इतिहासात इतकी मोठी पर्यावरण पूरक बस खरेदी कधी झाली नाही. म्हणूनच सध्या १५० इलेक्ट्रिक बस रस्त्यावर धावत आहेत. त्याचप्रमाणे पुढील काळात आणखी ३५० ई बस खरेदी करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: