एसओएस बालग्राममध्ये महिला डॉक्टरांनी साजरे केले अनोखे रक्षाबंधन…

पुणे : अनाथ, पोरक्या मुलांचा आणि विधवा महिलांचा मायेचा गाव असलेल्या ‘बालग्राम’मध्ये अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे करण्यात आले. पुणे डॉक्टर असोसिएशनच्या आनंदी महिला मंचच्या वतीने येरवड्यातील बालग्राम एस.ओ.एस. चिल्ड्रेन्स व्हिलेजमध्ये रक्षाबंधननिमित्त लाडू, चिवडा आणि इतर खाऊ वाटप करण्यात आले. प्रत्येक मुलाची प्रेम, काळजी आणि आपुलकीने विचारपूस उपस्थित महिला डॉक्टरकडून करण्यात आली. कृष्णाई हेल्थ सेंटरच्या वतीने बालग्राममधील मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर मुलांसोबत डॉक्टरांनी थोडा वेळ घालवला. बालग्राम मधील प्रसन्न वातावरणामध्ये सर्व उपस्थित डॉक्टर्स रममाण झाले होते.

यावेळी पुणे डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संभाजी मांगडे, पीडीए आनंदी महिला मंचच्या डॉ. शर्वरी आवळसकर, डॉ. स्मिता घुले, डॉ. स्वाती जगताप, डॉ. अरुंधती सोनावणे, डॉ. रुपाली गायधने, चंद्रशेखर शेवाळे, जेष्ठ पत्रकार विजय अंबाडे, बालग्रामच्या शुभांगी देशमुख, सुरेखा दळवी उपस्थित होत्या.

अनाथ, निराधार आणि निराश्रित मुलांचे कौटुंबिक वातावरणात संगोपन करून त्यांना आई, बहिण, भाऊ मिळवून देणे; त्याचबरोबर अन्न-वा-निवारा-शिक्षण आणि त्यांच्यावर उत्तम संस्कार करून त्यांचा सर्वांगीण विकास करणे, त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे, त्यांना स्वावलंबी बनवून स्वतःच्या पायावर उभे राहण्यास मदत करणे, समाजात एक जबाबदार नागरिक म्हणून सामावून घेण्यासाठी एसओएसची स्थापना झाली. मागील ४० वर्षाहून अधिक काळ अनाथ मुलांचे सांगोपन करण्याचे काम एसओएस बालग्राम हि संस्था करत आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: