Sunday, September 27, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

पुणे शहरामध्ये गेल्या 24 तासात कोरोनाचे 97 नवीन रुग्ण

पुणे:  शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. आज पुणे शहरातील नवीन रुग्णांची संख्या शंभरच्या खालीआली आहे. तर अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या एक हजाराच्या पुढे आली आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये 97नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 233रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 91 हजार  959 इतके कोरोना बाधित रुग्ण  आढळून आले आहेत. त्यापैकी 4 लाख 81हजार 133इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 10रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील5 तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 5रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 8890जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पुणे शहरामध्ये सध्या 1936 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 209 रुग्ण गंभीर आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 5788 स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पुणेमहापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading