fbpx

राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची आळंदी येथील गोविंद महाराज केंद्रे संस्था ग्रंथराज ज्ञानेश्वरी मंदिरास भेट

पुणे :राज्यातील अनेक धार्मिक संस्था, मठ,धर्मशाळा यांनी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित कोरोना संकटातही मदत कार्य करण्याचे काम केले. यात ह.भ.प. गोविंद महाराज केंद्रे संस्थानचे योगदान विसरता येणार नाही. महाराष्ट्राच्या संस्कृतीशी बांधिलकी जपत समाजाभिमुख कार्य करणाऱ्या राज्यातील धर्मशाळा, मठ, संस्थानचा विकास झाला पाहिजे यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य सरकार उपाययोजना करीत आहे अशी माहिती देत आळंदी येथील केंद्रे महाराज संस्थांनचे कार्य प्रेरणादायी असून केंद्रे महाराज संस्थानच्या विकासासाठी सर्वोतोपरी मदत करू अशी ग्वाही महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आळंदी येथे दिली. आळंदी ( देवाची ) येथे अखिल वारकरी संप्रदाय व ह.भ.प. गोविंद केंद्रे संस्थान यांच्या संयुक्त विध्यमाने आयोजित श्री ज्ञानेश्वरी हरिपाठ सांगता कार्यक्रम प्रसंगी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपस्थितांशी संवाद साधत असतांना राज्यमंत्री अब्दुल सत्तार बोलत होते. येथील ह.भ.प.गोविंद महाराज केंद्रे संस्था ग्रंथराज ज्ञानेश्वरी मंदिर येथे हा कार्यक्रम संपन्न झाला.

याप्रसंगी औरंगाबाद जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अर्जुन पा. गाढे, हरिदास ताठे, नॅशनल सूत गिरणीचे संचालक बाळासाहेब वाघ, सतीश ताठे, राजेंद्र ठोंबरे, सयाजी वाघ, सचिन पाखरे यांच्यासह संस्थानचे उत्तर अधिकारी विष्णू महाराज केंद्रे, कार्याध्यक्ष नानजीभाई ठक्कर, अनिल महाराज वाळके, भास्कर महाराज पवार, ज्ञानेश्वर रायकर, नगरसेवक नितीन गुंडरे, शिवराम वाघ, बाळासाहेब हिंगे, अविनाश वढेकर, सारंगधर ढेरे, अमित शिर्के, सुनील गाडगे आदिंची प्रमुख उपस्थिती होती.

या प्रसंगी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी मंदिराच्या सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. संस्थानचे उत्तर अधिकारी म्हणून विष्णू महाराज यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे स्पष्ट करीत संस्थानच्या वतीने करण्यात आलेल्या स्वागत सत्काराबद्दल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी संस्थानचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश बडेकर यांनी केले. प्रास्ताविक नानजीभाई ठक्कर यांनी तर विष्णू महाराज केंद्रे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Leave a Reply

%d bloggers like this: