fbpx
Friday, April 19, 2024
Latest NewsPUNE

…म्हणून मोदींचा पुतळा हटवला; त्या भाजप कार्यकर्त्याचे स्पष्टीकरण

पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भक्त असलेल्या एका भक्ताने पुण्यात चक्क त्यांचे मंदिर उभारले. या भक्ताच्या कृतीची थेट पंतप्रधान कार्यालयातून दखल घेण्यात आली. त्यानंतर आलेल्या आदेशानुसार पुणे येथील मंदिरातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मूर्ती रातोरात गायब झाली अशी चर्चा आहे. पुणे येथील औंध परिसरात मयुर मुंडे नामक व्यक्तीने ‘मोदी मंदिर’ उभारले. मयुर मुंडे हे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत. पुणे हे विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. अशा पुण्यात ‘मोदी मंदिर’ उभारण्यात आल्याने या मंदिराची पुणे शहर आणि महाराष्ट्रातही चर्चेचा विषय ठरला होता.


पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मंदिर उभारून त्यांचा मूर्ती बसवल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याचा मला फोन आला आणि त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेत जिवंत व्यक्तीचे मंदिर बांधून पूजा करणे हे बसत नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी बद्दल असलेल्या भावना रस्त्यावर मंदिर बांधून जाहीररीत्या व्यक्त न करता त्या भावना मनातच ठेवाव्यात असे त्यांनी सांगितले, त्यामुळे मी पंतप्रधान नरेंद्र मोदींची मूर्ती हटवली असे मंदिर उभारणाऱ्या मयूर मुंडे यांनी सांगितले.मी भारतीय जनता पार्टीचा एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून त्यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी या मंदिरातील मूर्ती काढण्याचा निर्णय घेतला असून माननीय पंतप्रधाना बद्दल
त्यांच्या मनातील असलेले भावना आदर  असाच  कायम राहणार असून ती मूर्ती आम्हाला सदैव प्रेरणा देण्यासाठी म्हणून आमच्या कार्यालय मध्ये ठेवणार आहोत. तिथे मूर्ती पूजा न करता सर्वांना प्रेरणा देण्यासाठी म्हणून आमचे वैयक्तिक कार्यालयांमध्ये मध्ये मूर्ती ठेवण्यात येणार आहे. अशी माहिती पुण्यातील पत्रकार परिषदेत ऍड. मधुकर मुसळे यांनी दिली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading