Wednesday, November 18, 2026
Latest NewsPUNE

कोयनानगर परिसरातील पूरग्रस्तांसाठी भोई प्रतिष्ठानचे अनोखे रक्षाबंधन

पुणे:सातारा जिल्ह्यातील कोयनानगर परिसरात मिरगाव ,हूंरबळी,कुंभारवाडी या गावावर अतिवृष्टीमुळे दरड कोसळून अनेक निष्पापानी आपले प्राण गमावले. तेथील बांधवांना व विशेषत लहान मुलांना भावनिक व मानसिक आधार देणे आवश्यक आहे. हे जाणवल्याने या दृष्टिकोनातून पुण्यातील भोई प्रतिष्ठानचे वैद्यकीय मदत या
पथक  परिसरात काही दिवस कार्यरत आहे या दुघटनेतील बाधंवाना व विशेषतः चिमुकल्यांना भावनिक व मानसिक आधार देण्यासाठी पुण्यातील भोई प्रतिष्ठान च्या वतीने ह्या बांधवांना रक्षाबंधन साठी पुण्यात आणले जाणार असून.
पुण्यातील साहित्य कला, सांस्कृतिक   प्रशासन ,पोलिस,शिक्षण आदी क्षेत्रातील मान्यवर त्यांच्याशी संवाद साधणार आहेत.

विविध गणेशोत्सव मंडळे सामाजिक संस्था सामाजिक कार्यकर्ते याचे या कार्यक्रमाच्या वैजनाथ सहकार्य लाभले असून हा कार्यक्रम रविवार दिनांक 22 ऑगस्ट 2021 रोजी सायंकाळी 5 ते 6 या वेळेत भारतमाता अभ्यासिका पर्वती गाव येथे संपन्न होणार आहे अशी माहिती पुण्यातील पत्रकार परिषदेत भोई प्रतिष्ठान चे अध्यक्ष डॉक्टर मिलिंद भोई यांनी दिली.
मिलिंद भोई म्हणाले, या प्रकल्पाचे समन्वयक म्हणून सचिन शिंदे विलास कदम डॉक्टर चंद्रकांत पवार हे काम पाहत आहेत. मुलांच्या शैक्षणिक वाटचालीसाठी भोई प्रतिष्ठान च्या वतीने सुरू करण्यात येणाऱ्या शिक्षण सेवा प्रकल्पाचा शुभारंभ सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर नितीन कळमकर यांच्या शुभहस्ते होणार आहे.


या कार्यक्रमास उपस्थित राहणारे मान्यवर
मुरलीधर मोहोळ महापौर पुणे, ओम प्रकाश बकोरिया आयुक्त क्रीडा व युवक कल्याण महाराष्ट्र शासन, जयश्री कटारे निवासी उपजिल्हाधिकारी पुणे, अतुल चंद्र कुलकर्णी डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस सीआयडी महाराष्ट्र, नामदेव चव्हाण अप्पर पोलीस आयुक्त पुणे, डॉक्टर जालिंदर सुपेकर अप्पर पोलीस आयुक्त पुणे, राहुल सोलापूरकर अभिनेते, हेमंत रासने अध्यक्ष स्थायी समिती पुणे, सुरेश कुटे मॅनेजिंग डायरेक्टर लिज्जत पापड, यशवंत मानखेळकर नेहरू युवा केंद्र भारत सरकार, डॉक्टर कांतीकेयन संचालक एन एस एस महाराष्ट्र,
माधुरी मिसाळ आमदार, रूपाली चाकणकर अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, झेलम चोबळ केसरी टूर्स, प्रशांत रणपिसे पुणे अग्नि माशक दलप्रमुख, अनिल गुंजाळ सहायक शिक्षण आयुक्त.

Leave a Reply