Thursday, November 19, 2026
Latest NewsPUNE

पुणे शहरामध्ये गेल्या 24तासात कोरोनाचे 254 नवीन रुग्ण तर 119 रुग्णांना डिस्चार्ज

पुणे: पुणे शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. आज पुणे शहरातील नवीन रुग्णांची संख्या दोनशेच्या वर आली आहे. तर अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या दोन हजाराच्या पुढे आल्याने  महानगरपालिकेची व आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे  गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये 254 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 119रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात  आले आहे.

पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 91 हजार 262 इतके कोरोना बाधित रुग्ण  आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 80हजार 208इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 10रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 12तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 7रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 8868 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
पुणे शहरामध्ये सध्या 2186 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 206रुग्ण गंभीर आहेत.
आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 9507 स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पुणेमहापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

Leave a Reply