Thursday, November 19, 2026
ENTERTAINMENTLatest News

सनी देओल आणि पूजा भट्ट तब्बल 24 वर्षांनंतर एकत्र झळकणार

प्रसिध्द दिग्दर्शक आर बल्की यांनी बॅालिवूडला अनेक ब्लॉकब्लस्टर चित्रपट दिले आहेत. यामध्ये ‘पा’, ‘इंग्लिश विंग्लिश’ ,’शमिताभ’, ‘पॅडमॅन’ , ‘मिशन  मंगल’ असे एकाहून एक सुपहिट चित्रपटांची यादी आहे. आर बल्की यांनी नुकते  सोशल मिडीयावर आपल्याआगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटात अभिनेता सनी देओल आणि अभिनेत्री पूजा भट्ट हे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. विशेष म्हणजे तब्बल 24 वर्षानंतर या दोघांची जोडी प्रेक्षकांना पडद्यावर पहायला मिळणार आहे. या पूर्वी या पूजा आणि सानी देओलने ‘अंगरक्षक’ या चित्रपटात एकत्र काम केले आहे.

हा चित्रपट सस्पेन्स थ्रिलर असणार असून अद्याप त्याचे नाव ठरलेल नाही. सनी देओल व पूजा भट यांसोबत या सिनेमात ‘श्रेया धन्वंतरी’ आणि ‘दुलकर सलमान’ हे कलाकार दिसणार आहेत. हा चित्रपट 2022 च्या सुरवातीला रीलीज होणार आहे. एकेकाळी गाजलेल्यांपैकी सनी देओल व पूजा भट या कलाकारांसोबत आपण काम करण्यासाठी उत्सुक असल्याचं आर बाल्की यांनी सांगितले आहे.  शिवाय हा सिनेमा प्रेक्षकांना सुध्दा तितकाच आवडेल असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. नुकतेच पूजा भट्टनेही आपल्या इनस्टाग्राम आकाऊंटवर ही याबात माहिती दिली आहे.

 

 

Leave a Reply