fbpx
Wednesday, April 24, 2024
Latest NewsPUNE

भाषण स्पर्धेत ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशनचे यश

पुणे : एम. सी ई सोसायटी व हाजी गुलाम मोहम्मद आझम एज्युकेशन ट्रस्ट यांच्या संयुक्त विदयमाने भाषण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. २५० विदयार्थी सहभागी झाले होते. एम. सी. ई सोसायटी चे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार व संस्थेच्या उपाध्यक्ष आबेदा इनामदार यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन सन्मानीत करण्यात आले. यावेळी सहसचिव इरफान शेख, प्राचार्या डॉ अनिता बेलापूरकर, विभागप्रमुख रिझवाना दौलताबाद यांनी यशस्वी विदयार्थ्याचे अभिनंदन केले.ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन ( डी.एड.) इंग्रजी माध्यमाचे विदयार्थी ‘आंतर कॅम्पस भाषण स्पर्धा सन २०२१ ‘च्या चषकाचे मानकरी ठरले.

ही स्पर्धा इंग्रजी व मराठी या दोन्ही भाषेत घेण्यात आली. चार गटात ही स्पर्धा पार पाडण्यात आली. यात ज्यनियर व सिनियर या गटात इंग्रजी भाषण स्पर्धेत ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन ( डी.एड.) इंग्रजी माध्यमाची विदयार्थिनी फ्लोरा दिलीप आढाव ( प्रथम वर्ष डी एड )यानी द्वितीय क्रमांक तर मलिहा आसिफ मेमन यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. मराठी भाषेतून समरीन शेख (प्रथम वर्ष डी एड) यांनी प्रथम कमांक तर अल् अदिव अब्दुल सत्तार शेख (द्वितीय वर्ष डी एड) तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला. या स्पर्धेत ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन इंग्रजी माध्यम च्या ५ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. त्यापैकी ४ विदयार्थी स्पर्धेचे यशस्वी मानकरी ठरले .म्हणुन गुणतालीकेत २९ गुण मिळवून ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन ( डी.एड.) इंग्रजी माध्यमाचे विदयार्थी ‘आंतर कॅम्पस भाषण स्पर्धा सन २०२१ ‘ च्या चषकाचे मानकरी ठरले.

स्पर्धा आयोजीत करण्यात गुलजार शेख यांनी सहकार्य केले. स्पर्धेत इंग्रजी भाषेच्या स्पर्धेसाठी कौशिन शेख , मराठी भाषेसाठी नुरजहाँ शेख यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. कार्यक्रमांचे सुत्रसंचालन अॅग्लो उर्दू हायस्कुलच्या शिक्षिका दिलशाद सय्यद यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading