Saturday, September 26, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNE

डॉ. अंजली सोमण यांना ‘मसाप’चा डॉ. गं. ना. जोगळेकर स्मृती पुरस्कार जाहीर

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेच्या वतीने, कै. डॉ. गं. ना. जोगळेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ, दरवर्षी मराठी वाङ्मयक्षेत्रातील बहुमोल योगदानाबद्दल मानाचा पुरस्कार दिला जातो. यावर्षीचा – सन २०२१ चा हा पुरस्कार, मराठी कथा, भाषाविज्ञान, स्त्रीसाहित्य आणि अन्य वाड्मयीन अभ्यासक्षेत्रात दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानासाठी डॉ. अंजली सोमण याना जाहीर झाला आहे. रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. सोमवार दि. २३ ऑगस्ट २०२१ रोजी सायंकाळी ५ वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित यांच्या शुभहस्ते डॉ. अंजली सोमण याना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. अशी माहिती मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading