Sunday, September 27, 2026
Latest NewsPUNE

श्रीमंत बाजीराव पेशवा पुतळ्यास कायमस्वरूपी शिडी ची व्यवस्था करणार – महापौर मुरलीधर मोहोळ.

पुणे : येत्या आठ दिवसात आवश्यक परवानग्या मिळवून श्रीमंत बाजीराव पेशवा यांच्या पुतळ्यास कायमस्वरूपी शिडी उपलब्ध करून देऊ अशी घोषणा महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केली.आवश्यकता भासल्यास यासाठी महापौर निधीतून निधी उपलब्ध करून देऊ असे ही ते म्हणाले.पुणे महानगरपालिका आणि ब्राह्मण महासंघातर्फे बाजीराव पेशवा यांच्या शनिवारवाडा येथील पुतळ्यास जयंतीदिनी माल्यार्पण करण्यात आले त्या प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी उपमाहापौर सुनीता वाडेकर, शिक्षण मंडळ अध्यक्ष नगरसेविका मंजुश्री खर्डेकर,ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे,भाजप चे शहर प्रवक्ते संदीप खर्डेकर, इतिहासकार मोहन शेटे, विद्याधर नारगोळकर, बाजीराव पेशवा प्रतिष्ठान चे कुंदन साठे, श्री. गांगल, मनपा सहाय्यक आयुक्त आशिष महाडदळकर उपस्थित होते.

मराठा साम्राज्याचे सेनापती अजेय योद्धा बाजीराव पेशवा यांचे स्मरण करणे आपले कर्तव्यच असून पुतळा परिसराच्या विकासासाठी जे जे काही लागेल ते करण्यासाठी पुणे मनपा कटीबद्ध आहे असे ही महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. किंबहुना बाजीरावांच्या अफाट कर्तृत्वापुढे नतमस्तक होताना त्यांच्या स्मृती आणि वैभवशाली इतिहास जतन करण्यासाठी माझा हातभार लागला तर मी नशीबवान ठरेन असेही ते म्हणाले.

तत्पूर्वी ब्राह्मण महासंघातर्फे लालमहाल ते शनिवारवाडा अशी भव्य मिरवणूक काढण्यात आली. बँड पथकसह,पारंपरिक वेशभूषेत फुगडी खेळणाऱ्या महिला व बाजीरावांच्या वेशातील चिमुकला गणेश दवे सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी बाजीरावांची जयंती मोठ्या प्रमाणावर साजरी करण्याचा संकल्प केला असल्याचे सांगितले. तसेच पुतळ्यास माल्यार्पण करणे सुकर व्हावे यासाठी शिडी चा खर्च ब्राह्मण महासंघ करेल असे सांगितले. .यावेळी काढण्यात आलेल्या शोभयात्रेचे संयोजन ब्राह्मण महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आनंद दवे, विश्वस्त मनोज तारे,श्रीपाद कुलकर्णी जिल्हा अध्यक्ष मयुरेश अरगडे, शहर अध्यक्ष हर्षद ठकार, महिला आघाडीच्या तृप्ती तारे,सुमन कुलकर्णी ,मधुरा बर्वे,निता जोशी ,क्रांती गोखले, विद्या घटवाई यांनी केले. यावेळी  शैलेश जोशी लिखित शिवशाहीचा उत्तरार्ध अर्थात पेशवाई चा इतिहास या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading