Wednesday, November 18, 2026
Latest NewsPUNE

पोस्ट अ‍ँड टेलिकॉम सोसायटीतर्फे स्वातंत्र्यदिन साजरा

 
पुणे : दि पुणे पोस्ट्स अ‍ॅण्ड टेलिकॉम को. आॅप. क्रेडिट सोसायटी लि. पुणे यांच्यावतीने ७५ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला.  संस्थेचे अध्यक्ष दीपक धुमाळ यांच्या हस्ते पुणे स्टेशनजवळील जीपीओ कम्पाऊंड  येथे ध्वजारोहण करण्यात आले.

कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष भानुदास कोलते, सचिव उमाकांत बालगुडे, तज्ज्ञ संचालक नागेश कुमार नलावडे, संस्थेचे संचालक मंडळ, व्यवस्थापक राजन कामठे, कर्मचारी वर्ग तसेच सभासद हजर होते.

यावेळी संस्थेच्या सभासदांना देण्यात येणा-या कर्जाची मयार्दा वेतनमर्यादेनुसार रु.५० लाख करण्यात सहकारी खात्यांकडून मंजुरी मिळाल्याची घोषणा केली. तसेच गेली ४० वर्षे संस्थेचे माजी सभासद बबन सूर्यवंशी, लतीफ शेख हे सातत्याने ध्वज बांधण्याचे काम करीत असून सभासद शकील शेख ध्वजवंदन कार्यक्रमाचे संचलन करत असल्याचे सांगितले.

Leave a Reply