Saturday, September 26, 2026
Latest NewsNATIONAL

तालिबानचे अमेरीकेला अल्टिमेटम, ११ सप्टेंबरपर्यंत देश सोडा

नवी दिल्ली : अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर तालिबान्यांनी आता थेट जगातील सर्वात शक्तिशाली अशा अमेरिकेलाच अल्टिमेटम दिले आहे . ११ सप्टेंबरपर्यंत अफगाणिस्तानची भूमी सोडण्याचा इशारा तालिबान्यांनी अमेरिकेला दिला आहे. तर अमेरिकेने तालिबानच्या आर्थिक नाड्या आवळण्यासाठी अमेरिकन बँकेत असणारी तालिबान सरकारची खाती गोठवली आहेत. त्यात सुमारे १० अब्ज डॉलर्स आणि सोने, विदेशी मुद्रा आहेत. सध्या अफगाणिस्तानात आता केवळ तालिबानला पाठिबा देणारे पाकिस्तान, चीन, रशिया या देशांचेच दूतावास सुरु आहेत.

सत्ता स्थापनेसाठी तालिबानने हालचाली सुरु झाल्या असून काबुलमध्ये टॉपचा तालिबानी म्होरक्या मुल्ला अब्दुल गनी बरादर याचे आज आगमन झाले. कतारहून सी-१७ विमानाने कडक सुरक्षा व्यवस्थेत तो अफगाणिस्तानात २० वर्षांनी दाखल झाला. तालिबान्यांनी समर्थकांकडून कंदाहारमध्ये मुल्ला बरादरचे जोरदार स्वागत केले. येत्या २० ऑगस्टला तालिबान सत्ता स्थापन करण्याची शक्यता व्यक्त आहोत आहे. अब्दुल गनी बरादर हा तालिबानचा सह-संस्थापक मुल्ला ओमरचा सगळ्यात विश्वासू सहकारी आहे. २०१० मध्ये पाकिस्तानमधील कराची शहरात त्याला अटक करण्यात आली होती. मात्र, अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आदेश आणि तालिबानसोबत झालेल्या करारानंतर पाकिस्तानने मुल्ला बरादरची २०१८ मध्ये सुटका केली.

तालिबान्यांचे महिलांवरील अत्याचार सुरु असून आज त्यांनी अफगाणिस्तानच्या सरकारी वाहिनीमधील अँकर खादीजा अमीन यांना तेथील अधिकाऱ्यांनी काढून टाकले आहे. अफगाणिस्तानात सर्वत्र अराजकता पसरली असल्याने सुमारे तीन लाख अफगाणांनी तालिबानपुढे शस्त्र ठेवले आहे. परंतु काबुल मध्ये काही महिलांनी तालिबानचे शासन झुगारून निषेध केला. ५ महिला काबूलमध्ये निषेधाचे फलक घेऊन उभ्या होत्या. आमचे अधिकार अबाधित ठेवा असे या फलकावर लिहिले होते. सशस्त्र सेनानी या महिलांना घरी जाण्यास सांगत होते. पण या महिला परतल्या नाहीत.

दरम्यान, तालिबानविरोधात झुंज देणाऱ्या बाल्क प्रांताच्या राज्यपाल सलीमा मजारी यांना तालिबानने ताब्यात घेतले असून मजारी या शेवटपर्यंत तालिबानसोबत दोन हात करत होत्या. अमेरिकेने सैन्य माघारीची घोषणा केल्यानंतर तालिबान आक्रमक झाला होता. त्यावेळी मजारी यांनी तालिबानचा प्रतिकार करणार असल्याचे म्हटले होते. त्या अफगाणिस्तानमधील पहिल्या महिला राज्यपाल आहेत. तालीबानने आक्रमण केल्यानंतर अफगाणिस्तानमधील राजकीय आणि सैन्य अधिकारी देश सोडून पळून जात असताना दुसरीकडे सलीमा मजारी यांनी आपल्या समर्थकांसह तालिबानविरोधातील लढाई सुरू ठेवली होती. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading