Saturday, September 26, 2026
Latest NewsPUNE

आरोग्य सेना जनलोक मेडिकल्सचे उद्घाटन

पुणेः- महासत्ता बनण्याची पुरेपूर क्षमता आपल्या देशात आहे. पण जनतेचे आरोग्य उत्तम असल्याशिवाय भारताला महासत्ता बनता येणार नाही. यासाठी पहिली पायरी जनतेला वाजवी दरात औषधे आणि वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देणे ही आहे, असे मत आरोग्य सेनेचे संस्थापक राष्ट्रीय प्रमुख आणि समाजवादी नेते डॉ. अभिजित वैद्य यांनी व्यक्त केले.
आरोग्य सेनेच्या जनलोक मेडिकल्स या दर्जेदार आणि स्वस्त जेनेरिक औषधांच्या दुकानांच्या साखळीतील ९ व्या दुकानाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. पुण्यातील धनकवडी भागातील त्रिमुर्ती चौकाजवळ या दुकानाचे उद्घाटन डॉ. वैद्य यांच्या हस्ते करण्यात आले.
डॉ.वैद्य म्हणाले,  आरोग्य सेना कोणत्याही सरकारी मदतीविना जनलोक मेडिकल्सची साखळी विस्तारित आहे. अत्यल्प किंमतीत औषधे देणारी ही दुकाने सर्वांचा आधार बनत आहेत. भविष्यात महाराष्ट्रभर किमान १०० जनलोक मेडिकल्स उभी करण्याचा आमचा मानस आहे.
जनलोक मेडिकल, शाखा क्रमांक ९ चे व्यवस्थापक निलेश साळुंखे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. डॉ. नितीन केतकर यांनी प्रास्ताविक केले. लक्ष्मीकांत मुंदडा यांनी आभार मानले. प्रा. प्रमोद दळवी यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading