कम्युनिस्ट पक्षाची सहकार वाचवा परिषद 28 ऑगस्ट रोजी कोल्हापूर येथे
पुणे: महाराष्ट्राच्या विकासाचा आढावा घेतला तर त्यामध्ये सरकारचा खूप मोठा वाटा आहे .म्हणून केंद्राच्या शेतकरी विरोधी कायद्याबद्दल सूचना ऐवजी महाराष्ट्र सरकारने स्वतःच्या महाराष्ट्र कृषी उत्पादन खरेदी विक्री नियम अधिनियम 1963 मध्ये काय बदल केलात. खरेदी-विक्रीच्या व्यवहारात तयार झाला नफा हा प्रत्यक्ष ज्या शेतकऱ्यांनी आपला मान विकला असेल त्या शेतकऱ्यांपर्यंत बोनस स्वरूपात डिव्हीडट , रिबेट या मार्गाने नफ्यामध्ये वाटा मिळू शकतो. यासंदर्भात सर्वांनी विचार करण्यासाठी सहकार वाचवा परिषद आयोजित केली आहे .सहकार वाचवा परिषद मुस्लिम बोर्डिंग दसरा चौक कोल्हापूर येथे दिनांक 28 ऑगस्ट 2 021 रोजी सकाळी बारा वाजता ही परिषद होईल. अशी माहिती पुण्यातील पत्रकार परिषद भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सहसचिव नामदेव गावडे यांनी दिली.
या पत्रकार परिषदेला भाई बाबुराव कदम शेकाप, वसंतराव पाटील जनता दल सेक्युलर उपस्थित होते.
नामदेव गावडे म्हणाले, या परिषदेस सरकारशी संबंधित साखर कारखाने कृषी उत्पन्न बाजार समिती सहकारी बॅंका पतसंस्था दूध संस्था विकास सोसायटी गृहनिर्माण संस्था कन्सुमर सोसायटी वस्त्रोद्योग संस्थेची संबंधित संचालक कर्मचारी वर्ग उपस्थित असतील त्यांना सादर करण्याचा प्रस्ताव या परिषदेत मांडला जाईल या परिषदेच्या अध्यक्षस्थानी विश्वास नारायण पाटील अध्यक्ष कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ ,असून प्रमुख वक्ते प्राध्यापक व्ही.बी कवडे राज्यशास्त्र विभाग शिवाजी विद्यापीठ सहकारातील जानकार उपस्थित राहणार आहेत.
