Sunday, September 27, 2026
ENTERTAINMENTLatest NewsMAHARASHTRA

राज कुंद्राच्या जामीन अर्जावर 25 ऑगस्टला सुनावणी

मुंबई : पॉर्न फिल्म प्रकरणात गुन्हा दाखल असलेल्या राज कुंद्राला मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी अटकेपासून अंतरिम दिलासा दिला आहे. राज कुंद्रावर लावण्यात आलेले गुन्हे हे सर्व ७ वर्षांपेक्षा कमी कारावासासह दंडनीय आहेत आणि म्हणून या जामीन अर्जाला परवानगी द्यावी, असा युक्तिवाद कुंद्राच्या वकिलांनी केला. त्यानंतर के. शिंदे यांनी कुंद्राला अटक होण्यापासून संरक्षण देणारा अंतरिम आदेश देत सुनावणी २५ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलली आहे.

पॉर्न फिल्म प्रकरणी राज कुंद्रा याच्यावर २०२०मध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यात अटकपूर्व जामिनासाठी त्याने गेल्या आठवड्यात  याचिका दाखल केली होती. अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर राज यांच्या वतीने ही याचिका दाखल करण्यात आली होती. राज यांनी आपल्या याचिकेत दावा केला आहे की, या प्रकरणातील इतर आरोपींना जामीन मंजूर करण्यात आला आहे आणि त्यामुळे त्यांनाही जामीन मंजूर करण्यात यावा. उच्च न्यायालयात याचिकेला विरोध करताना अतिरिक्त सरकारी वकील प्राजक्ता शिंदे यांनी युक्तिवाद केला की या प्रकरणात कुंद्राची भूमिका या प्रकरणातील इतर आरोपींपेक्षा वेगळी आहे. त्यांनी अर्जाबाबत पुढील निर्देश मिळवण्यासाठी वेळ मागितला. न्यायमूर्ती शिंदे यांनी त्याला वेळ दिला. कुंद्राला पुढील सुनावणीपर्यंत म्हणजेच 25 ऑगस्टपर्यंत अटकेपासून संरक्षण देण्याचे निर्देश दिले.राज कुंद्राला जुलै महिन्यात अश्लील चित्रफितीवरून अटक करण्यात आली होती. सध्या तो तुरुंगात आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading